Home माझं गाव माझं गा-हाणं गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घ्या

गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घ्या

74
0

राजेंद्र पाटील राऊत

गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव
वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घ्या

  मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

विश्रामगृहात कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते.

शाळा, कॉलेज व खाजगी क्लासेस यांची संयुक्त बैठक घेवून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ऑनलाईन शैक्षणीक पध्दतीच्या अवलंबासह मर्यादित संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सुचना दिल्या. *पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने संयुक्तपणे पथकांची नेमणूक करून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपात कारवाई करण्याचे निर्देशही* त्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या टेस्टींगसह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे असेही त्यांनी नमूद केले.

मालेगाव शहरातील कोरोनाची परिस्थिती आज नियंत्रणात असली तरी नागरिकांनी गाफील राहता कामा नये. नागरिकांनी आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा कटू निर्णय घ्यावे लागतील असा इशाराही मंत्री श्री.भुसे यांनी दिला आहे. सर्व व्यावसायीकांनी देखील मास्क नाही तर प्रवेश नाही अशी भुमीका घेवून येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

कोरोना रुग्णांचा शहरासह ग्रामीण भागाचा आढावा घेतांना ग्रामीण भागातील रुग्णांसाठी झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयासह निमगाव येथे पर्यायी व्यवस्था अद्यावत ठेवण्यात यावी. सामान्य रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनास यावेळी दिले.

Previous articleवाखारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleएकच_मिशन मराठा_आरक्षण 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here