• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे कोरोना (covid-19) प्रतिबंधक लसीकरण सुरुवात.

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे कोरोना (covid-19) प्रतिबंधक लसीकरण सुरुवात.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210402-WA0053.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे कोरोना (covid-19) प्रतिबंधक लसीकरण सुरुवात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे आज दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरा बु. अंतर्गत उपकेंद्र उंद्री (प.दे) येथे covid-19 च्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सकाळी दहा वाजता पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे सुरू करण्यात आले. उंद्री प. दे. येथील सरपंच श्रीमती वनिता रमेश गनलेवार यांच्या हस्ते फित कापून लसीकरनास सुरुवात करण्यात आली. गावातील नागरिक श्री सुधाकर हौसाजी गनलेवार यांनी प्रथमता लस घेतली.45 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना वयोवृद्ध नागरिकांना कोरोना covid-19 या महामारीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभरात आरोग्य यंत्रने मार्फत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. त्यामुळे उंद्री प.दे. गावातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना व वयोवृद्ध नागरिकांना ही लस देण्यात येत आहे कोरोना महामारी पासून आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी व गावातील नागरिकांना कोरोना होऊ नये यासाठी ही लस देण्यात येत असून तरी गावातील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता निसंकोचपने लस घेऊन सहकार्य करावे आणि स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी व त्याच बरोबर बाहेर फिरत असताना मास्कचा वापर करावे सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये साबणाने हात स्वच्छ धुऊन घ्यावे विना मास्क बाहेर पडू नये गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी सरपंच श्रीमती वनिता रमेश गनलेवार, उपसरपंच सौ.रमाताई संदीपराव सोनकांबळे, ग्रा.पं. सदस्य राजू गंगाधर वाघमारे, देवानंद सोनकांबळे, आकाश पाटील वडजे ,ज्ञानेश्वर पाटील वडजे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनमंत पाटील वडजे, उमेश उंद्रीकर, मारोती पाटील मटके तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी डॉ.सौ.एस.व्ही.जाधव, आरोग्यसेविका सौ.जे.एन.खरात , आरोग्यसेवक एन.बी. पांचाळ, सुपरवायझर गरुडकर बी.एम. अंगणवाडी सेविका एस. के. नागठाणे, एस जी मिठाळकर, एम. डी.भोकरे, सेविका ई.जे.वादे व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment