Home पुणे विद्यार्थ्यांना अभिनयामध्ये उत्तम करिअर घडवता येईल” — ______कृष्णकुमार गोयल

विद्यार्थ्यांना अभिनयामध्ये उत्तम करिअर घडवता येईल” — ______कृष्णकुमार गोयल

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0000.jpg

विद्यार्थ्यांना अभिनयामध्ये उत्तम करिअर घडवता येईल”
— ______कृष्णकुमार गोयल

खडकी,(प्रतिनिधी उमेश पाटील) : ज्याप्रमाणे खडकी महाविद्यालय हॉकी या क्रीडा प्रकारामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सलग तीस वर्षे अजिंक्यपद प्राप्त करीत आहॆ. त्याचप्रमाणे आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्रात ही आपल्या महाविद्यालयाचे नाव आपले विद्यार्थी नक्कीच उंचीवर नेतील असा मला विश्वास वाटतो आहॆ,यासाठी विद्यार्थ्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे ” असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांनी केले.
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वार्षिक उपक्रमाचे उदघाट्न श्री. गोयल यांचे शुभहस्ते महाविद्यालयात संपन्न झाले. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. आनंद छाजेड, संचालक पदाधिकारी श्री. राजेंद्र भूतडा,रमेश अवस्थी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. श्रीपाद ढेकणे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. महादेव रोकडे, डॉ. तेजस्विनी शेंडे,प्रा. विजय रास्ते, बाबासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. कृष्णकुमार गोयल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, ” सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभागी झाले पाहिजे जेणेकरून अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होण्यास त्यांचा फायदा होईल. आज आपले विद्यार्थी नाट्य, चित्रपटामध्ये अभिनय करीत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले तर नक्कीच सांस्कृतिक क्षेत्रात ही आपले महाविद्यालय राज्यस्तरावर पोहचेन. ”
यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी पुढील महिन्यात संपन्न होणाऱ्या विद्यापीठीय स्तरावरील “इंद्रधनुष्य ” या स्पर्धेबाबत माहिती दिली.. विद्यार्थ्यांनी यावेळी गायन, मिमिक्री, आणि प्रहसन आणि एकपात्री प्रयोग सादर केले.
प्रा. महादेव रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जितेंद्र मडके, विकास वाघमारे, ऋतिक रास्ते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रा विजय रास्ते यांनी आभारप्रदर्शन केले.

Previous articleशेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड .
Next articleनांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे बत्तासे, यांच्या घरात पाणीचे  हौदमध्ये आढळले पाच फूट कोब्रा तस्कर, घोरपड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here