Home नाशिक सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा

सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0053.jpg

सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे .                कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी बनवावी याचे कृतीयुक्त मार्गदर्शन श्री.फणसे सर यांनी केले.शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मातीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही याचे महत्त्व श्रीमती पठाण मॅडम यांनी पटवून दिले. तसेच विद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शाडू माती पुरवण्यात आली. शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन .सुनील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सरचिटणीस प्रमिला, कासलीवाल,संचालक महेंद्र चांदिवाल ,मुख्याध्यापक व्ही. पी. सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जगताप, विजय जाधव, अभिजीत थोरात ,श्रीमती,धन्वंतरी देवरे, जयश्री चोळके, अनिता पवार,वैशाली शिंदे, यांनी विशेष प्रयत्न केले.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाडूच्या माती पासूनच बनवलेल्या मूर्ती घेण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here