• Home
  • 🛑 मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज…! 🛑

🛑 मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज…! 🛑

🛑 मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज…! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕ अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची कन्या आराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती अभिषेकनं ट्विट करून दिली. त्यानं ट्विटमधून प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.

अभिषेक बच्चननं वडील अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची माहितीदेखील ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

सध्या तरी दोघांवर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे,’

असं अभिषेकनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.

अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून दिली होती….⭕

anews Banner

Leave A Comment