• Home
  • 🛑 दरवाढीला ब्रेक; पेट्रोल-डिझेलसाठी ‘हा’ आहे आजचा भाव 🛑

🛑 दरवाढीला ब्रेक; पेट्रोल-डिझेलसाठी ‘हा’ आहे आजचा भाव 🛑

🛑 दरवाढीला ब्रेक; पेट्रोल-डिझेलसाठी ‘हा’ आहे आजचा भाव 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 28 जुलै : ⭕ जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थेच ठेवल्या. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये आहे. तर डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ८१.९४ रुपयांच्या ऐतिहासिक स्तरावर आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी डिझेलमध्ये १५ पैशांनी वाढ केली होती. सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली. राजधानी दिल्लीत डिझेल प्रति लिटर ८१.९४ रुपयांवर, मुंबईत ते १४ पैशांनी वाढून ८०.१७ रुपये या किमतीवर पोहचले होते. या दरांमध्ये स्थानिक कर, मूल्यवर्धित कर यांची भर पडून डिझेल आणखी महागले.

पेट्रोलचा दर मात्र रविवारी बदलला नाही. यापूर्वी २९ जून रोजी पेट्रोलचा दर बदलला होता. त्यानंतर गेल्या चार आठवड्यांपासून पेट्रोलचा दर तसाच राहिला आहे. करोना संसर्गामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाउन काळात सर्वसामान्यांना झळ पोहोचू नये म्हणून दोन्ही इंधनांचे दर बदलण्यात आले नव्हते. मात्र, त्यांनतर सलग २१ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली. या दिवसांत पेट्रोल एकूण प्रति लिटर ९.१७ रुपयांनी महागले. डिझेलचे दर मात्र जुलै महिन्यातही सातत्याने वाढते राहिले आहेत.

मुंबई प्रमाणे देशातील इतर प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली. सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ४३.११ डॉलर प्रती बॅरल आहे.

डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. मच्छिमार बोटींसाठी डिझेलचा वापर केला जातो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवरच चालतात. डिझेलमध्ये होत असलेली दरवाढ या घटकांचा खर्च वाढवणारी आहे. इंधन दरवाढीने येत्या काही आठवड्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.⭕

anews Banner

Leave A Comment