Home नाशिक वनसगाव विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे शुक्रवार रोजी आयोजन

वनसगाव विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे शुक्रवार रोजी आयोजन

87
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230920-194155_WhatsApp.jpg

वनसगाव विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे शुक्रवार रोजी आयोजन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचे थोर शिक्षण महर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ वी जयंती सोहळा व पारितोषिक वितरण शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान धनंजय रत्नाकर डुंबरे (अध्यक्ष, वनसगांव शिक्षण प्रसारक मंडळ) हे भूषविणार असून डॉ. सुधीर जी तांबे (मा. विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य ),डॉ. सुजित जी गुंजाळ (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा), एकनाथ लक्ष्मण शिंदे (व्यवस्थापक ,वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळ), विकास दवंगे (वॉटर फिल्टर देणगीदार कंपनी एरिया मॅनेजर नाशिक), आप्पासाहेब गाडे (वॉटर फिल्टर देणगीदार नाशिक ) हे प्रमुख अतिथी असणार आहेत. कर्मवीर जयंती सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून लेखक समीर देवढे सर (लासलगाव) हे उपस्थित असतील .या प्रसंगी सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी व स्थानिक सल्लागार शिक्षण समिती, सर्व पदाधिकारी – वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळ, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य (वनसगाव ,ब्राह्मणगाव, सारोळे खुर्द ,थेटाळे ,खानगाव), पोलीस पाटील, चेअरमन , व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ (विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था वनसगाव ,सारोळे खुर्द) तसेच विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ ,माता पालक संघ ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यरत व सेवानिवृत्त विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी, पत्रकार संघ , माजी विद्यार्थी, विद्यालयातील सर्व सेवक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कर्मवीर जयंती सोहळा संपन्न होणार असून सकाळी ७.३० वाजता पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व मिरवणूक संपन्न होणार आहे .तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे व पर्यवेक्षक के. बी.दरेकर यांनी केले आहे.

Previous articleककाणीच्या माध्यमिक विद्यालयात गणरायांचे जल्लोषात स्वागात!
Next articleलासलगाव गटाचे चे प्रश्न मार्गी लावा- दिशा समिती मार्फत सौ सुवर्णाताई जगताप यांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here