Home गडचिरोली १४ जून च्या बाईक रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा आमदार डॉक्टर देवरावजी...

१४ जून च्या बाईक रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

54
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220612-WA0079.jpg

१४ जून च्या बाईक रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजयुमोची १४ जूनला सायंकाळीं ५ वा. गडचिरोली शहरामध्ये भव्य बाईक रॅली

दिनांक १२ जून २०२२ गडचिरोली

भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बाईक रॅलीला युवावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली इंदिरा गांधी विश्रामगृहात भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी गडचिरोली भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर ,युवा मोर्चाचे पदाधिकारी अनिलभाऊ तिडके, हर्षल गेडाम ,राजू शेरकी, श्रीकांत भाऊ कोडापे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सबका साथ, सबका विकास सबका विश्वास ,या विकासाच्या मूलमंत्राने भारताला नवीन दिशा दिली आहे. त्यांच्या या ८ वर्षाच्या कालावधीमध्ये भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावलेली असून त्यांनी केलेल्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी सार्थ ठरत आहेत. त्यांच्या या ८ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने गडचिरोली शहरांमध्ये १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली स्थानिक इंदिरा गांधी चौका मधून रॅलीचा शुभारंभ होऊन गडचिरोली शहरांमध्ये फिरल्यानंतर मा. खासदार अशोकजी नेते यांच्या कार्यालयाजवळ रॅलीचे समापन होणार आहे तरी या रॅलीला युवावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here