Home उतर महाराष्ट्र ककाणीच्या माध्यमिक विद्यालयात गणरायांचे जल्लोषात स्वागात!

ककाणीच्या माध्यमिक विद्यालयात गणरायांचे जल्लोषात स्वागात!

128

आशाताई बच्छाव

IMG-20230919-WA0060.jpg

म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे):-साक्री तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात काल लालबागच्या राजा गणरायाचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढून विधिवत पूजा करून स्थापना केली. गेल्या दोन वर्षापासून विद्यालयाच्या प्रांगणात गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह व चैतन्य दिसून येते आहे. तसेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचे गणपती तयार केलेल्या आहेत. यातील उत्कृष्ट मूर्तींना बक्षिसे दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या गणपतीचे काल अनेकांनी कौतुक केले. यावर्षी सात दिवस गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. या काळात शालेय स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसही दिली जाणार आहेत अशी माहिती शिक्षक प्रसाद बेडसे यांनी दिली.काल स्थापनेच्या प्रसंगी ग्रामपुरोहित गणू महाराज दीक्षित, साने गुरुजी शैक्षणिक संस्थेचे सचिव उत्तमराव बेडसे, संचालक बारकू बेडसे, अरुण बेडसे, जगन्नाथ सोनवणे, एन.डी.शिंदे, रवींद्र बेडसे, मुख्याध्यापक भटू वाणी, शिक्षक व्ही.वाय.कुवर, पी.डी. शेवाळे, जी.एम.मारणर, बी.आर.सोनवणे, के.व्ही. देवरे, प्रसाद बेडसे, रोजगार सेवक किशोर बेडसे, आदर्श शेतकरी सोनू बेडसे, ज्ञानेश्वर बेडसे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous articleभिलखेडा येथे सामाजिक सुरक्षा सहाय्यता व मार्गदर्शन शिबीर संपन्न
Next articleवनसगाव विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे शुक्रवार रोजी आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.