Home गडचिरोली 17 जून ला जिल्हा काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा

17 जून ला जिल्हा काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0018.jpg

17 जून ला जिल्हा काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने झालेल्या उदयपूर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने घेण्यात आलेल्या शिर्डी येथील नवसंकल्प शिर्डीच्या धर्तीवर 17 जून रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, एकदिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात जिल्हातील काँग्रेसचे सर्व जेष्ठ नेते, आजी माजी आमदार, खासदार, जिल्हा कार्यकारणीचे सर्व सदस्य, सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व नगरसेवक, आजी माजी जि.प., प.स. सदस्य उपस्थित राहणार आहेत.
शिबिराचे उद्धाटन राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्ष म्हणून माजी खास. मारोतराव कोवासे, प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित वंजारी, तर मुख्य वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके, जेष्ठ पत्रकार प्रा.प्रभाकर कोनबत्तुरवार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अक्षय साळुंके, नागपूर महानगरपालिका नरसेवक प्रफुल गुळदे पाटील, सह प्रदेश काँग्रेसचे इतर मान्यवर मंडळी व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करून होणार आहे त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व वक्त्यांचे मार्गदर्शन होणार, कार्यशाळेत शेतकरी आणि शेतमजूर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण गट, संघटन गट, राजकीय गट, आर्थिक गट, युवा समूह आणि महिला गट असे सहा गट तयार करण्यात आले असून या सहा गटात प्रमुख म्हणून अनुक्रमे आदिवासी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी,
प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ.नामदेव किरसान, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते उपस्थित राहणार असून यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद च्या निवडणुका लक्ष्यात घेता जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्षाचे आगामी ध्येय धोरण ठरविण्यात येणार असून येणाऱ्या काळात फक्त जिल्हातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्यात येणार आहे.
त्या संदर्भात नियोजनाकरिता जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा कार्यालयात बैठक पार पडली असून यावेळी शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, स्वयंरोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, प्रभाकर कुबडे, विश्वनाथ राजनहिरे, भैयाजी मुद्दमवार, अनिल भांडेकर, वसंत राऊत, चोखाजी भांडेकर, कृष्णा झंजाळ, विकास रायशिडाम, भाऊराव पाल, रमेश चौखुंडे, हरबाजी मोरे, देवेंद्र भांडेकर, संजय चन्ने, माजिद सय्यद, जावेद खान, विपुल येलेट्टीवार, मयुर गावतुरे, अमजद खान सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी.
Next articleग्रामसभेत विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here