• Home
  • नाशिक. चोराने सीसीटीव्ही ला गुंगारा देत केली दागिन्यांची चोरी

नाशिक. चोराने सीसीटीव्ही ला गुंगारा देत केली दागिन्यांची चोरी

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक. चोराने सीसीटीव्ही ला
गुंगारा देत केली दागिन्यांची चोरी

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज नेटवर्क

नासिक रोड .बंद दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने एक लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान एका चोरट्याने हेल्मेट परिधान केलं होतं.
चेहडी पंपिंग भगवा चौक येथील साई आदेश अपार्टमेंटमध्ये राहणारे शशिकांत विष्णुपंत गायके यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कुलूप तोडून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट त्याचप्रमाणे 15 ग्रॅम वजनाचे 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मंगळसूत्र पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओम पान व कानातील बाळ्या असा ऐवज चोरून नेला.

चोरी झाल्याची घटना गायके यांच्या लक्षात येताच त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांनी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके हे करत आहे.

anews Banner

Leave A Comment