Home नांदेड गाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव मोहीमेस माकणी येथे तहसिलदार श्री काशिनाथ पाटील यांच्या...

गाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव मोहीमेस माकणी येथे तहसिलदार श्री काशिनाथ पाटील यांच्या शुभहस्ते सुरुवात.

253
0

राजेंद्र पाटील राऊत

गाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव मोहीमेस माकणी येथे तहसिलदार श्री काशिनाथ पाटील यांच्या शुभहस्ते सुरुवात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
▪️माकणी साठवण तलावातुन तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्या हस्ते ऊदघाटन

बार्‍हाळी येथुन जवळ असलेल्या माकणी येथे साठवण तलावातुन गाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव या मोहोमेचे तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्या नारळ फोडुन ऊदघाटन करण्यात आले.

तालुक्यातील साठवण तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण होत नसल्याने तालुक्याचे तहसिलदार काशीनाथ पाटील यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले की ज्या शेतकर्‍यांना गाळ लागत असेल तर त्यांनी घेवुन गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार बनवावे असे आवाहन केले होते त्या आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी नेते बालाजी पाटील ढोसणे यांनी माकणीचे तरुण शेतकरी सुनील गव्हाणे यांना गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवाराचे महत्तव पटवुन सांगीतले त्यावेळी शेतकरी सुनील गव्हाणे यांनी स्वखर्चाने जेसिबी ट्रक्टरच्या सह्ह्याने तलावातील गाळ काढुन आपल्या शेतीस नेत असल्याने तलावातील पाणी पातळीत वाढ होवुन परीसरातील विहिर बोअरवेलला भाविष्यात फायदा हौत असल्याने तहसिलदारांच्या अभिनव उपक्रमाने शेतकर्‍यातुन समाधान व्यक्त होत आहे.यावेळी बालाजी पाटील ढोसणे,माकणीचे सरपंच प्रविणकुमार गव्हाणे,कबनुरचे सरपंच रामदास वाघमारे,पंढरी कांबळे,ऊपसरपंच माधव टेबुर्णे,सुरेश टेबुर्णे,गजानन गव्हाणे,अनिल गव्हाणे आदी
उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here