Home विदर्भ खाणींच्या विरोधासाठी एटापल्लीत महा मोर्चा काम बंद करण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन!

खाणींच्या विरोधासाठी एटापल्लीत महा मोर्चा काम बंद करण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन!

121
0

राजेंद्र पाटील राऊत

खाणींच्या विरोधासाठी एटापल्लीत महा मोर्चा काम बंद करण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन!               गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोह खानीसह गडचिरोली जिल्हातील 25 खानीच्या लुज तत्काळ रद्द कराव्या मुख्ख मागणीसह इतर अनेक मागण्या करिता उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महाग्रामसभेच्या वतीने 198 गावातील नागरिकासह भामरागड अहेरी या तालुक्यातील नागरीक सहभागी झालेत: मोर्चाचे नेतत्व जिल्हा परिषद चे अध्यक्ष अजय कंकलवार महाग्राम सभेचे इलाका प्रमुख तथा जि. प.सदस्य सैनी गोटा , माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंन्डी आदिनी केले यावेळी जिल्हा कॉग्रेस कमिटिचे अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हनवाडे , ग्रामसभेचे नितीन पदा , लालसु नरोटी ,नंदू मडावी, यानी मार्गदर्शन केले यानंतर दोन किमी रांग असलेला मोर्चा शासकिय मुलीच्या वसतीगृहात येवुन धडकला त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यानी तहशीलदार प्रदिप शेवाळे एसडिपिओ सुदर्शन पाटिल ठानेदार विजयानंद पाटिल याच्या उपस्थितीत मोर्चाक-यांसमोर निवेदन स्विकारले, या निवेदनावर वरिल नावासह अमोल मारकवार , संजय चरडूके,हसन गिल्यानी ,प.स.सदस्य अजय नैताम , पं.स.सदस्य सुरेखा आलाम ,अनिल कोठारे, आदिंचे नावे आहेत सभेचे संचालन प्रज्वल नागूलवार यानी केले.गावक-यांनी केली पायपिट,अनेक गावातील नागरीक पायीच चालत येवुन या मोर्सचात सहभागी झाले, जि.प.अध्यक्ष अजय कंकलवार यानी स्वता मोर्चाक-यांना पाण्याचे बाटल्या वाटुन त्याचा उत्साह वाढविला ,दोन दिवसापासुन गठ्ठा विभागातील नागरिक आलेत सैनू गोटा यांनी आपण शेवट पर्यत लढा चालु ठेवु अशी भुमिका व्यक्त केली, जि.प.अध्यक्षानी आपण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकही खान नको,अशी भुमिका घेतली होती असे सांगितले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here