Home नांदेड मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1000 एल पी एम क्षमतेचे पी एस ए...

मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1000 एल पी एम क्षमतेचे पी एस ए ऑक्सिजन प्लांट उभारला आ. डॉ. तुषारजी राठोड यांच्या पाठपुराव्याला यश नागरिकांत समाधानीचे वातावरण.

132
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1000 एल पी एम क्षमतेचे पी एस ए ऑक्सिजन प्लांट उभारला

आ. डॉ. तुषारजी राठोड यांच्या पाठपुराव्याला यश नागरिकांत समाधानीचे वातावरण.

नांदेड ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड शहरातील 100 खाटाच्या उपजिल्हारुग्णालयात एक हजार एल पी एम क्षमतेचे पी एस ए ओकिसजन प्लँट उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून नागरिक समाधानाची भावना व्यक्त करत आहेत. आ.
तुषार राठोड यांच्या पाठपुरावा व प्रयत्नाला मोठे यश आले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे च्या प्रादुर्भावाची शक्यता वर्तवली जात असताना ओक्सिजन प्लांट कार्यरत होत असल्याने स्थानिक पातळीवर गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुडवडा भविष्यात भासणार नसून ग्रामीण सह शहरी भागातील रुग्णांच्या आरोग्याची सोय उपजिल्हा रुग्णालयात होणार आहे.
मुखेड शहरात जिल्ह्यातील एकमेव शंभर खाटाचे उपजिल्हारुग्णालय कार्यरत आहे तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात तालुका वसलेला असल्याने आरोग्य सुविधा जेमतेमच आहेत जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका मुखेड असून 129 ग्राम पंचायत अस्तित्वात आहेत. सर्व सामान्य ग्रामस्थ नागरिकांच्या आजारावरील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव भक्कम आधार केंद्र आहे.
कोव्हिडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक कोव्हिड बाधीत रुग्ण मुखेड तालुक्यात आढळून आले आहेत कोव्हिड आजाराचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी मार्च 2020 साली व आ डॉ तुषारजी राठोड हे स्वत: डॉक्टर असल्या कारणाने त्यांच्या दूरद्रष्टीकोनातून 50 खाटाचे कोव्हिड केअर सेंटर जिल्ह्यात सर्व प्रथम उभारण्यात आले. कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आल्याने पुढील काळात स्थानिक कोव्हिड बाधीत रुग्णाला स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. व त्याची मोठी सोय झाली कोव्हिडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन लाईन असलेल्या खाटाची मोठी कमतरता सर्वत्र जाणवू लागली दुसऱ्या लाटेत कोव्हिड बाधीत रुग्ण संख्याची वाढती आकडेवारी पाहता सर्वत्र हाहाकार उडाला होता. ऑक्सिजनची कमतरता टंचाई जाणवत असल्याने उपचारासाठी मधल्या काळात अनेक अडचणींना तज्ञ डॉक्टरांना सामोरे जावे लागले आहे. कोव्हिड बाधीत गंभीर अति गंभीर रुग्णांसाठी मुखेड ते नांदेड अंतर 80 किमी मुखेड ते लातूर अंतर 110 किमी असल्याने उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची मोठी गैरसोय होऊ लागली होती या दोन ठिकाणां शिवाय दुसरा अन्य पर्याय नागरिकांसमोर उपचारासाठी नव्हता व एकच धावपळ होऊ लागली रुग्णांची होत असलेली गैरअवस्था पाहून आ. डॉ. तुषारजी राठोड यांनी आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात नवीन पो एस ए प्लांट तात्काळ उभारावे तो एक हजार एल पी एम क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट उभारावा अशा मागणीचे पत्र दि. 20 जून रोजी दिले व राज्य शासनाकडे विनंती करून सातत्याने पाठपुरावा केले होते
त्यांच्या पाठपुराव्याला नुकतंच यश आले असून उपजिल्हा रुग्णालयात एक हजार क्षमतेचे एल पी एम क्षमतेचे पी एस ए प्लांट उभारण्याचे काम नुकतंच सुरू करण्यात आले आहे या मुळे स्थानिक पातळीवर उपजिल्हा रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाची आरोग्य विषयक उपचारासाठी मोठी सोय झाली आहे. सर्वसामान्य ग्रामीण भागातील नागरिकांनी याबाबत समाधानाची भावना व्यक्त केली आहे कोव्हिडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भाव शक्यतेने नागरिक भेदरलेले असतानाच ऑक्सिजन प्लँट मूळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर हाताळण्यासाठी तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात यावे, कार्डियक ॲम्बुलन्स द्यावी, नियमित वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात लवकरच सिटीस्कॅन मशीन कार्यरत होणार असून अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यरत होणार असून जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी अडचणी बाबत बांधील असून यापूढे आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवू नागरिकाने लसीकरण मोठ्या प्रमाणावर करवून घ्यावे कोव्हिड विषयक शासकीय सर्व नियम सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन आ. डॉ. तुषारजी राठोड यांनी केले आहे.

Previous articleखाणींच्या विरोधासाठी एटापल्लीत महा मोर्चा काम बंद करण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन!
Next articleचौकात भाकरी बडवून महागाईचा निषेध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here