Home पुणे चौकात भाकरी बडवून महागाईचा निषेध

चौकात भाकरी बडवून महागाईचा निषेध

102
0

राजेंद्र पाटील राऊत

चौकात भाकरी बडवून महागाईचा निषेध                               पिंपरी चिंचवड(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

पुणे-मुंबई महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापासून (मोरवाडी चौक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत (पिंपरी चौक) पदयात्रा काढून आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. इंधन, जीवनाश्यक वस्तूंच्या दरवाढीस केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. पिंपरी चौकात महिलांनी चूल पोटवून त्यावर भाकरी बनवली, तसेच दोन वाहने बैलगाडीमध्ये ठेऊन व काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध केला.
मोदींच्या आशिर्वादाने नागरिकांच्या नशिबी महागाईचा भस्मासूर

महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून महागाईचा भस्मासूर एक दिवस भाजपला सत्तेपासून दूर केल्याशिवाय राहणार नाही. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान खालावले आहे, जगणे मुश्किल झाले आहे, असा सूर आंदोलनात उमटला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं जीवनमान प्रचंड खालावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षापूर्वी अच्छे दिनचे दाखवलेले गोड स्वप्न शेवटी गोडच राहिले आणि महागाईसारखा भस्मासुर सर्वसामान्यांच्या नशिबी आला आहे, सरकारने ताबडतोब सर्वसामान्यांची दिवाळी महागाई त्वरित कमी करून गोड करावी अशी मागणी घोळवे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here