Home विदर्भ डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम मॉम ऑरगॅनिक मार्केट दि.२ पासुन सुरु

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम मॉम ऑरगॅनिक मार्केट दि.२ पासुन सुरु

280
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम
मॉम ऑरगॅनिक मार्केट दि.२ पासुन सुरु

अकोला:(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन मार्फत शनिवार दि.२ ऑक्टोबर पासून अकोला येथे सेंद्रीय शेतीमालाच्या विक्रीसाठी ‘मॉम ऑरॅनिक मार्केट’ सुरु होणार आहे.येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) ऑफिस परिसर, आरडीजी कॉलेज समोर, मुर्तिजापुर रोड येथे हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक आरीफ शाह यांनी दिली आहे.
डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. त्याअंतर्गत शेतकरी गटांचे संघटन केले जाते. तसेच क्षमता बांधणी करुन शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाचे विपणनासाठी सुविधा दिली जाते. या मिशनमध्ये ७५०० शेतकरी सहभागी असून त्यांचे ३९५ शेतकरी गट व त्या गटांच्या ३६ कंपन्या स्थापित झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांचा एकत्रित महासंघ तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादीत सेंद्रीय शेतमालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.याद्वारे नागरिकांना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या प्रमाणित केलेली सेंद्रीय उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आहे. या उपक्रमाचा अकोला शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here