Home विदर्भ असंघटीत कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

असंघटीत कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

118
0

राजेंद्र पाटील राऊत

असंघटीत कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करा;
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

अकोला(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-: केंद्र शासनाव्दारे असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ‘ई-श्रम पोर्टल’ची सुरुवात करण्यात आली आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामागारांकरिता सामाजीक सुरक्षा योजना अंमलात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे, दुकान निरीक्षक विनोद जोशी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर.बी. हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक कै.जा.सोळंके, महिला व बाल विकास विभागाचे समुपदेशक सचिन घाटे, महानगरपालिकेचे प्रतिनिधी संगिता ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी विटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच असंघटित क्षेत्रातील विडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, विटभट्टी कामगार, भाजी व फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजीक सुरक्षितता पुरविण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. याकरीता शासनाने ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलवर असंघटित कामगारांनी नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले आहे.

नोंदणीकरीता पात्रता: असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्षे 16 ते 59 दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली कोणतीही बँक), सक्रिय मोबाईल नंबर (ओटीपीकरीता स्वत:चा अथवा कुटूंबातील अन्य व्यक्तीचा), स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

असंघटित कामगारांनी ई-श्रम पार्टलवर नोंदणी स्वत:, नागरी सुविधा केंद्र, कामगार सुविधा केंद्रावर किंवा eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. तसेच राष्ट्रीय हेल्पलाईन 14434 व टोल फ्री 18001374150 क्रमांकावर तसेच अधिक माहितीसाठी कामगार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleडॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम मॉम ऑरगॅनिक मार्केट दि.२ पासुन सुरु
Next articleआपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी चार कोटी 71 लाख रु. निधी जिल्ह्याला प्राप्त – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here