Home नाशिक येवल्याचा फेटा पोहोचला साता समुद्रापार

येवल्याचा फेटा पोहोचला साता समुद्रापार

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_195259.jpg

येवल्याचा फेटा पोहोचला साता समुद्रापार

श्रीकांत खंदारे यांनी रशियात तिरंगा फेटा बांधत वेधले विदेशी पाहुण्यांचे लक्ष

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

रशियातील साची शहरात आयोजित वर्ल्ड युथ फेस्टिव्हल मध्ये येवल्याचे फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी युथ फेस्टिव्हल मध्ये विदेशी पाहुण्यांना तिरंगा फेटा बांधत डंका वाजविला असून येवल्याचा फेटा साता समुद्रा पार पोहोचविला आहे. यावेळी फेटे बांधण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. वर्ल्ड युथ फेस्टिव्हल २०२४ रशियामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व येवल्याचा फेटा संस्कृती ,परदेशातील असंख्य व्ही आय पी पाहुण्याच्या डोक्यावर तिरंगा फेटा दिसला. रशिया सरकारच्या वतीने सर्वांत मोठा महोत्सव साजरा करण्यात आला.
रशिया सरकार १ मार्च ते ९ मार्च दरम्यान रशियातील सोची येथे जगातील सर्वांत मोठ्या वर्ल्ड फेस्टिव्हल रशिया येथे महाराष्ट्रातुन निवड झालेले अनेक राज्यांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरातील १९० देशांच्या लोकांशी संपर्क आपल्या देशाची संस्कृती, त्यांच्या डोक्यावर तिरंग्याचा फेटा ,भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या ,२० हजारांहून अधिक रशियन आणि परदेशी युवा संशोधकांसह माध्यम, व्यापार, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संस्कृती,कला संस्कृती विज्ञान, शिक्षण आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या जागतिक वर्ल्ड फेस्टिवलला रशियात सहभागी झाले होते.
भारतातर्फे सहभागी झालेल्या ३६० जणांच्या शिष्टमंडळामध्ये येवला येथील फेटा कलासंस्कृती, भारताचे कल्चर फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी १९० देशांतील सहभागी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, क्रीडा मंत्री अनेक व्हीआयपी आले होते. युथ फेस्टिव्हल मधील सहभागी झालेले डेलिगेट भारत, श्रीलंका ,न्युझीलँड ,फ्रान्स, जपान ,चीन ,पाकिस्तान अफगाणिस्तान अनेक देशातील डेलिगेट फेटे बांधण्यात आले.त्यांच्याशी मैत्रीपूर्ण देशाची संस्कृती कल्चर या संस्कृतीची माहिती आदान प्रदान करण्यात आली .
येवल्याच्या पैठणीची चर्चा जगभरात आहे, येवल्याच्या पैठणी ओळख असून शेल्यासह फेटे ही तयार केले जातात, या फेट्यांना जगभरात श्रीकांत खंदारे यांनी ओळख निर्माण करून दिली आहे ,मोदी यांना युथ फेस्टिव्हल मध्ये पैठणी फेटा बांधला होता, यापूर्वी मोदी यांना अकरा वेळेस फेटे बांधले आहेत ,माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांनाही फेटा बांधण्यात आलेला आहे.

⚫ चांगले शिक्षण झालेले असताना नोकरीच्या मागे न लागता फेट्याच्या कलेला एका उंचीवर नेण्याचे काम केले. आतापर्यंत सिंगापूर, मलेशिया येथेही निमंत्रित केले असून या ठिकाणी फेटे बांधून आकर्षित केले आहे .
श्रीकांत खंदारे, फेटा कलाकार येवला

Previous articleजीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.
Next articleवाढत्या लोकप्रियतेमुळे केजरीवाल यांना अटक डुंगरवाल यांचा आरोप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here