Home उतर महाराष्ट्र वाढत्या लोकप्रियतेमुळे केजरीवाल यांना अटक डुंगरवाल यांचा आरोप

वाढत्या लोकप्रियतेमुळे केजरीवाल यांना अटक डुंगरवाल यांचा आरोप

64
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_195633.jpg

वाढत्या लोकप्रियतेमुळे केजरीवाल यांना अटक डुंगरवाल यांचा आरोप

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी):आम आदमी पार्टी चे अध्यक्ष दिल्ली चे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
यांना झालेल्या घटनाबाह्य अटक च्या निषेधार्थ राष्ट्रपती यांच्याकडे प्रांत अधिकारी यांच्यामार्फत जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की
दिल्ली सह पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय आणि राष्टीय पातळीवर पक्षाचा वाढता प्रभाव धर्म, जात, पंत, भाषा, लिंग, अस्मिता, प्रांत या विचारणा मागे टाकून केजरीवाल दिल्ली मॉडेल म्हणजे लाईट, पाणी ,आरोग्य,शिक्षण, रोजगार, व्यवसाय,या पायाभूत सुविधा आणि देशाचा विकास हे राजकारण स्वीकारत आहेत.आणि भविष्यात सत्तेवर येण्यासाठी इतर पक्षांना आम आदमी पक्ष बाधा येऊ शकतो हे मनात ठेवून त्यांना खोटा केस मध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला, आम आदमी पार्टीची वाढती लोकप्रियता हीच खरी या अटकेला कारणीभूत ठरली आहे, दिल्ली व पंजाब राज्यांमध्ये आम आदमी पार्टीने नागरिकांसाठी मोफत वीज, पाणी, शिक्षण ,आरोग्य ,या सर्व योजनांच्या माध्यमातून केलेला विकासाचा ठसा देशभर उमटविला आहे इतरही राज्यातील नागरिकांनी दिल्ली व पंजाब मॉडेलची मागणी विविध राज्यांच्या जनतेने केली त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कदाचित त्यांच्यावर ही सूडबुद्धीने केलेली कारवाई असावी असे मत आपचे नेते तिलक डुंगरवाल यांनी यावेळेस व्यक्त केले केजरीवाल यांना घटनेबाह्य अटके संदर्भात राष्ट्रपतींनी निपक्ष पणे चौकशी करून सर्वसामान्य जनतेचे काम करणाऱ्या केजरीवाल यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, राहुल रणपिसे, शहराध्यक्ष अक्षय कुमावत, श्रीधर कराळे, भैरव शेठ मोरे, भरत डेंगळे, डॉ प्रवीण राठोड, आदी उपस्थित होते

Previous articleयेवल्याचा फेटा पोहोचला साता समुद्रापार
Next articleनांदेड लोकसभा देगलूर-बिलोली विधानसभा संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.- मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here