Home Breaking News MNS: करोना रुग्णांची होतेय फसवणूक?; मनसेचा आरोग्यमंत्री टोपेंवर गंभीर आरोप 🛑 मुंबई...

MNS: करोना रुग्णांची होतेय फसवणूक?; मनसेचा आरोग्यमंत्री टोपेंवर गंभीर आरोप 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

95
0

🛑 MNS: करोना रुग्णांची होतेय फसवणूक?; मनसेचा आरोग्यमंत्री टोपेंवर गंभीर आरोप 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 03 जुलै : ⭕ MNS targets Rajesh Tope राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. यात करोना बाधित रुग्णांचेही उपचार केले जात आहेत. सामान्य व गरीब रुग्णांना या योजनेमुळे फार मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

‘ सध्या सर्वांसाठीच वरदान ठरत असताना या योजनेवर मनसेने गंभीर आरोप केले आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचा दावा मनसेने केला आहे. (‘ महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना ‘ सध्या सर्वांसाठीच वरदान ठरत असताना या योजनेवर मनसेने गंभीर आरोप केले आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचा दावा मनसेने केला आहे. ( MNS targets Rajesh Tope )

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये फसवणूक होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी १ लाख २० हजार रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार केल्याचा जो दावा केला आहे तो खोटा आहे. त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यायचा हवा, अशी मागणी.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये फसवणूक होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ लाख २० हजार रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार केल्याचा जो दावा केला आहे तो खोटा आहे. त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यायचा हवा, अशी मागणी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.

राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत अशा १ लाख २० हजार करोना बाधित रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार केलेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या माहितीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. मुळातच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही करोना बाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की, आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार करोना बाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न गजानन काळे यांनी टोपे यांना केला आहे.

सरकारचा निर्णय नेमका काय? करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने २ जून रोजी घेतला. या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येत आहेत. आधी राज्यातील ८५ टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. नव्या निर्णयानुसार उर्वरित १५ टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळत आहे. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात राहणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्हींचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खासगी रुग्णालयांमध्ये करोनासाठी उपचार घेता येत आहेत. त्याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या १३४ उपचारांपैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खासगी रुग्णालयांमध्ये ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यताप्राप्त दराने करण्याचे निश्चित झाले आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here