Home नांदेड नांदेड लोकसभा देगलूर-बिलोली विधानसभा संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.- मा....

नांदेड लोकसभा देगलूर-बिलोली विधानसभा संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.- मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.

60
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_202008.jpg

नांदेड लोकसभा देगलूर-बिलोली विधानसभा
संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.- मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

(देगलूर): दिनांक 23 मार्च 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता
सिद्धेश्वर मंगल कार्यालय, उदगीर रोड देगलूर येथे १६-नांदेड लोकसभा ९०, देगलूर-बिलोली विधानसभा
संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक बैठकीचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक,
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण व
माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी
मा.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
(खासदार तथा उमेदवार, नांदेड लोकसभा मतदारसंघ)
लोकसभा निवडणूक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,विधानसभा प्रमुख तथा माजी.आ.सुभाषराव साबणे
यांच्या उपस्थितीत होते.तरी देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,आजी -माजी लोकप्रतिनिधी,सुपरवॉरियर्स,सर्व मोर्चा /आघाडी पदाधिकारी,शक्ति केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख व कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटक प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोकराव चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या २०२४ लोकसभेच्या निवडणूक साठी तयारीला लागा प्रतापराव पाटील चिखलीकराना पन्नास हजारच्या मतआदीकाने निवडून आणायचे आहे व आपकी बार चारशे पार मोदीजी चे स्वप्न पूर्ण करूया या कार्यक्रमानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले .त्यावेळी व्यंकटराव पाटील गोरेगावकर भारतीय जनता पार्टीचे देगलूर माजी आमदार सुभाषरावजी साबणे,भारतीय जनता पार्टी देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, चंद्रशेखर पाटील सावळीकर बिलोली तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी , प्रशांत लच्छिराम दासरवाड भाजप शहराध्यक्ष देगलूर , संतोष पाटील दिगंबर कौरवार, अशोक साखरे नामदेव थडके ,शिवराज पाटील माळेगावकर आदी देगलूर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व संघटनात्मक बैठक पक्ष प्रवेश सोहळ्याचे कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleवाढत्या लोकप्रियतेमुळे केजरीवाल यांना अटक डुंगरवाल यांचा आरोप
Next articleमाझ्या आठवणीतली होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here