Home बीड परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय संजय लोहकरे यांचा परळी पत्रकार संघ व...

परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय संजय लोहकरे यांचा परळी पत्रकार संघ व अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार संपन्न!

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240204_061548.jpg

परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय संजय लोहकरे यांचा परळी पत्रकार संघ व अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार संपन्न!

 

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

 

बीड/परळी दि: ०३ परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री संजय लोहकरे यांनी नुकताच पीआय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परळी येथील पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न झाला.
परळी शहर पोलीस स्टेशनच्या पीआय श्री.रवि सानप साहेबांची बदली झाली व त्यांच्या जागी नवीन पीआय म्हणून श्री संजय लोहकरे यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस स्टेशन मध्ये त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. संजय लोहकरे हे अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी तसेच अवैध धंदे कमी होण्यास मदत होईल. पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य माणसाची कामे पडतात त्यामुळे त्यांच्या कामांना साहेब न्याय देतील असा विश्वास परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्री. बालकिशन सोनी व सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार मोहन चव्हाण, सुधाकर गीते, अंबादास पोपळघट, विकास जोशी आदी उपस्थित होते.

Previous articleनकली नोटा छापण्याच्या 3 मशीन, 41 लाखांच्या 2 महागड्या कार अन् 19 लाख कॅश जप्त
Next articleलाडली बेटीया’ चित्रपटाच्या शो ला परळीत प्रेक्षकांची तुफान गर्दी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here