Home अमरावती अमरावतीत नामांकन, प्रचार रॅली ऑल सभास्थळही निळ्या व भगव्या पथकाचा वर चष्मा

अमरावतीत नामांकन, प्रचार रॅली ऑल सभास्थळही निळ्या व भगव्या पथकाचा वर चष्मा

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_201706.jpg

अमरावतीत नामांकन, प्रचार रॅली ऑल सभास्थळही निळ्या व भगव्या पथकाचा वर चष्मा
__________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
लोकशाहीचा महासंग्राम सुरू झाला आहे. राज्यात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, जुनी बाजूचा सामना दुवा ठरला आहे. निळ्या भगव्या पतका ,नामांकर रॅली, प्रचार सभा असो की नेत्यांचे रोड शो एवढेच नव्हे तर उमेदवारांच्या मतदारांशी भेटीगाठी दरम्यान सामाजिक समरसता दर्शवण्यासाठी या पताका आसमंतात उंचावल्या जातात. यामध्ये राजकीय पक्षाचे झेंडे अकोले घेण्याचे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात ७मे, चौथ्या टप्प्यात १३मे, तर पाचव्या टप्पा २०मे रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. उष्णता चा तापमान ४२ते४४ आणि सूर्य दर दिवशी आग ओळखत असला तरी विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना प्रचार करावच लागत आहे.मैदानात असलेल्या उमेदवारांना प्रचार करावाच लागत आहे . चांद्यापासून बांद्यापर्यंत महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहे. आणि त्यांच्यातच प्रामुख्याने लढत आहे. प्रचार सभा व उमेदवाराच्या मुख्य प्रचार कार्यालयात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, होर्डिंग, पुतळे प्रामुख्याने लावण्यात येत आहे. विशेषतः विदर्भात महायुती असो वा महाविकास आघाडीचा उमेदवार, त्यांच्या गळ्यात पक्षीय दुपट्टे ऐवजी भगवे, निळे दुपट्टे ठळकपणे निदर्शनात यावे, याचे भान राखले जात आहे. सभेत, मेळाव्यातही भगवी, निळ्या झेंड्याचा बोल बाला महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेना, रिपाई (आठवले गट) पीरिपा(कवाडे गट) यांच्यासह ११ पक्ष-गट सामील आहे. महाविकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे सेना, रिपाई (आंबेडकर गट) उपेंद्र खोब्रागडे (खोरीपा), भीमशक्ती संघटना सोबत आहे. विशेषता काँग्रेस, भाजप उमेदवारांच्या प्रचार सभा, मिळावे आणि यादीमध्ये पक्षाच्या झेंड्यापेक्षा भगव्या निळ्या झेंड्याचा बोलबाला दिसून येत आहे. विशेषता डोक्यावरील टोपी लक्ष विधी दिसून, लोकसभा निवडणूक प्रचारात भगव्या निळ्या झेंड्याचा क्रेझअसताना अलीकडे उमेदवारासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील टोपी सुद्धा मतदारांचे लक्ष वेधत आहे. त्यातील ही टोपी भगवी निळे असून विदर्भात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारात उमेदवार सामाजिक समीकरण आपल्या बाजूने जुळून आणण्यासाठी लक्ष विधीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here