Home नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र

14
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_201406.jpg

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा
: शशांक मिश्र

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनीही घेतला जिल्ह्याचा आढावा.

मराठवाडा विभागीय संपादक
मनोज बिरादार

नांदेड दि ५ एप्रिल : १६-नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या कार्यासाठी आता सज्ज झाला आहे. तुम्ही सर्वांनी उत्तम तयारी केली आहे. पुढील काही दिवस डोळ्यात तेल घालून प्रशासन व पोलीस यांनी एकत्रित समन्वय आणि काम करा, असे आवाहन सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्र, पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्याच्या निवडणूक तयारीचे सादरीकरण यावेळी केले. याशिवाय सीईओ मीनल करनवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विभाग प्रमुखांनी सादरीकरण केले.

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कठोरपणे हाताळा आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने निवडणूक काळात संवेदनशीलतेने समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनी यावेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेपासून तपासणी पथकाच्या तत्परतेबाबत आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यरत असून स्थानिक गुन्हे क्षेत्र व या ठिकाणीची वारंवारता याबद्दल उत्तम माहिती असणारे आहात. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

निवडणूक निर्णय कक्ष, स्वीप, प्रशिक्षण व व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम कक्ष, मतदान, मीडिया, माहिती व्यवस्थापन तक्रार निवारण कक्ष सीव्हीजील, वाहतूक व संपर्क व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तसेच नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

Previous articleश्रीरामपूर येथे लाखो रुपयांची दारू जप्त
Next articleअमरावतीत नामांकन, प्रचार रॅली ऑल सभास्थळही निळ्या व भगव्या पथकाचा वर चष्मा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here