Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर येथे लाखो रुपयांची दारू जप्त

श्रीरामपूर येथे लाखो रुपयांची दारू जप्त

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_200900.jpg

श्रीरामपुर ,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)श्रीरामपुर शहरात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपीस एकुण 5,32,720/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह अटक मा.अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर व श्रीरामपूर शहर पोलीसांची संयुक्त कारवाई.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन 2024 च्या अनुषंगाने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. वैभव कलुबर्मे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी अवैध दारु वाहतुक व विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोहेकॉ/शंकर चौधरी, पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पोना/ रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी पोसई/ समाधान सोळंके, पोसई/दिपक मेढे, पोकॉ/राहुल नरवडे, पोकॉ/ अजित पटारे, पोकॉ/ संभाजी खरात यांचे पथक नेमुण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दित अवैध दारु धंदयांवर कारवाई करणेकामी आदेशीत करण्यात आले.
दि. 05/04/2024 रोजी वरील पथक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध दारु धंदयांवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 23/00 वा.चे सुमारास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना श्रीरामपूर नेवासा जाणारे रोडवर कांदा मार्केट समोर एक विना नंबरची सिल्व्हर रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार वेगाने नेवासा रोडकडे जाताना दिसली. सदर गाडीचा पथकास संशय आल्याने सदर गाडीस हात दाखवुन गाडी रस्त्याचे बाजुला थांबवीली. गाडी मध्ये काय आहे याबाबत चालकास विचारणा केली असता गाडीचालक व त्याचे सोबत असणाऱ्या इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यास विश्वासात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1.करण बाबासाहेब केंदळे वय 27 रा.लक्ष्मीनगर नेवासा ता.नेवासा जि.अहमदनगर 2. मोहसीन रशीद इनामदार वय -30 रा. बाजारतळ नेवासा ता.नेवासा जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
त्याचवेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये खालील वर्णनाचा प्रोहीबिशन गुन्ह्याचा माल विनापरवाना व बेकायदा वाहतुक करताना मिळुन आला तो पुढील प्रमाणे
1) 13,440 /-रु.किं.ची बॉबी संत्रा देशी दारुचे 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी 180 मिलीच्या 48 क्वार्टर प्रत्येक क्वार्टरची किमंत 70/-रु असलेली
2)9,600/- रु.किं.ची गोवा जिन दारुचे 2 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 100/-रु असलेली
3)9,120/- रु.किं.ची टु बर्ग बिअर चे 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या प्रत्येकी 650 मिलीच्या प्रत्येक बाटलीची किमंत 190/-रु असलेली
4) 4,560/- रु.किं.ची किंग फिशर बिअर चे 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या प्रत्येकी 650 मिलीच्या प्रत्येक बाटलीची किमंत 190/-रु असलेली
5) 8,640/- रु.किं.ची बी – 7 दारुचे 1 बॉक्स एक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 180/-रु असलेली 6) 25,920/- रु.किं.ची रॉयल स्टॅग दारुचे 3 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 180/-रु असलेली.
7) 61,440/- रु.किं.ची इम्पिरीयल ब्ल्यु दारुचे 8 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 160/-रु असलेली
1,32,720/- रु. कि.चा एकुण अवैध दारुचा मुददेमाल. तसेच
4,00,000/- रु.किं.ची अवैध दारु वाहतुक करण्या करीता वापरलेले स्विप्ट डिझायर कार
5,32,720/- रु. असा एकुण किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील अवैध दारु वाहतुक करणाऱ्या आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला पोना सचिन सिताराम धनाड, नेम अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं 423/2024 म.प्रोव्हि.का.कलम 65 (अ),83 प्रमाणे दि.06/04/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. वैभव कलुबर्मे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच मा.डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि.पोलीस उपनिरीक्षक/दिपक मेढे, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोहेकॉ/शंकर चौधरी, पोना/सचिन धनाड, पोना/ संतोष दरेकर, पोना/ रामेश्वर वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत

Previous articleनाशिक पंचवटी येथील वेदिका वृद्धाश्रमातील 21 कर्तुत्ववान महिलांचा गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने सन्मान
Next articleलोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here