Home नाशिक भक्ती ,ज्ञान ,वैराग्य परिपूर्ण करणारी भागवत महापुराण कथा—भागवत कथाकार ह भ प...

भक्ती ,ज्ञान ,वैराग्य परिपूर्ण करणारी भागवत महापुराण कथा—भागवत कथाकार ह भ प राजेंद्र महाराज चव्हाण

247
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_110148.jpg

भक्ती ,ज्ञान ,वैराग्य परिपूर्ण करणारी भागवत महापुराण कथा—भागवत कथाकार ह भ प राजेंद्र महाराज चव्हाण

दैनिक युवा मराठा / रामभाऊ आवारे निफाड

भक्ती ज्ञान वैराग्य परिपूर्ण करणारी कथा प्रेम रसाचे दान देणारी कथा आणि कलियुगामध्ये फक्त श्रवणाने सहजतेने मोक्ष प्राप्त करत करून देणारी श्रीमद् भागवत महापुराण कथा आहे.
भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धतेमहान/
माया मोह निरासस्य वैष्णव क्रियेते कदम//
श्रीक्षेत्र येवला पारेगाव रोड शिंदे कॉम्प्लेक्स येथे संपन्न होत आहे .कथाव्यास भागवताचार्य ह भ प श्री राजेंद्र जी महाराज चव्हाण गुजरखेडे यांचा रसाळ वाणीतून ही कथा संपन्न होत आहे. कथेचे यजमान कथेचे परीक्षिती श्री राजेंद्र दगडू पाटील पोलीस उपनिरीक्षक येवला तालुका ग्रामीण यांच्या छत्तीस वर्ष केलेल्या पोलीस प्रशासनामध्ये सेवानिवृत्ती निमित्त ही कथा संपन्न होत आहे .कथेमध्ये चतुर्थ दिवस गजेंद्र मोक्ष कथा, समुद्रमंथन कथा श्री वामन अवतार कथा ,संक्षिप्त मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा आणि परिपूर्णतम श्रीकृष्ण परमात्म्याचे प्रागट्य इथपर्यंत कथा संपन्न झाली. भाग्योदयन बहुजन्म समर्जीतेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावै // अनंत जन्मीचा भाग्योदयाने कथा श्रवण होत असते जीवनामध्ये सतसंगती महत्त्वाची आहे संगे वाढे शीण संगे घडे भजन उद्धाराला अधःपतनाला संगती कारणीभूत असते देव सुद्धा सत्संगाची इच्छा करतो. जीव संसारामध्ये रममान झाला की कधी काळ जीवनात येतो हे कळतही नाही त्याप्रमाणे नकळत गजेंद्राचा पाय काळरूपी नक्राने पकडला. गजेंद्र हा जीव आहे मगर काळाच स्वरूप आहे आणि संसार हा सरोवर आहे. काळ प्रथमता आपल्या जीवनात आल्यानंतर आपले पायच पकडतो बलपूर्वक कितीही प्रयत्न केला तरी कोणीही काळाच्या ताब्यातून सुटत नाही. सर्व परिवार पत्नी ,मुलं ,संपत्ती कोणीही साह्य होत नाही. मनुष्याला देवाशिवाय पर्याय नाही बल काम देत नाही परिवार काम देत नाही म्हणून प्रभूला हाक मारा. अनन्य भावाने प्रभुला हाक मारली की तो धावून येतो आणि संकटातून मुक्त करतो.आपण संकट मुक्तीसाठी गजेंद्र मोक्ष पाठ वाचला पाहिजे. कोणताही जन्म असेल पण हरिभक्ती महत्त्वाचे आहे .हरी भक्तिने इतर प्राणी सुद्धा तारले गेलेले आहेत. मनुष्य जीवनात वयाच्या सोळाव्या वर्षी समुद्रमंथन सुरू होते .संसार समुद्राचे मंथन करून ज्ञान भक्ती रूप अमृत प्राप्त करावं. .देव दानवांचा सहकार्याने मंदिराच्या आणि वासुकी यांचा सहकार्याने देव दानवांनी समुद्रमंथन केले समुद्रमंथन केल्यानंतर पहिला रत्न म्हणजे विष आहे परमार्थामध्ये पहिल्यांदा विष पचवावं लागतं तेव्हा आपण अमृता पर्यंत पोहोचतो कृष्ण कीर्तन अमृत आहे. हे विष भगवान शिवजी ग्रहण करतात वारकरी संत मालिकेमध्ये संत मीराबाई यांनी देखील विष पचवलेलं आहे. वराह अवतार नृसिंह अवतार आणि श्री वामन देव अवतार एकाच कुळासाठी झाले. मदीरा पान आणि स्त्री संग या दोन दोषामुळे दैत्यांचे राज्य स्वर्गावरती टिकत नसायचं राजा बली अनेक अश्वमेध यज्ञ करतात आणि नंतर विश्वजीत यज्ञाचं आयोजन करतात. बळीराजा जेव्हा ब्राह्मणांचा अपमान करेल तेव्हा नष्ट होईल भगवान परमात्मा खुजट द्विजवर कौपीनधारी भगवान वामन अवतार धारण करतात आणि राजा बळीच्या यज्ञामध्ये बृहस्पती आज्ञेने भिक्षा मागण्यासाठी जातात. बळी पत्नी विद्यावली कन्यारत्नमाला पाय धुवून वामन देवांचे स्वागत करतात माझ्या पितंरांचा उद्धार करा यज्ञ सफल करा अशी प्रार्थना राजा बळी वामन देवांकडे करतात मागणी मागा असा आग्रह करतात .भगवान वामन देव म्हणतात आम्ही संतोषी ब्राह्मण आहे. फक्त संधेसाठी मला थोडीशी जमीन हवी आहे. तीन पाद भूमी मला पाहिजे संकल्पपूर्वक दान दे संकल्प सोडला जातो आणि मग भगवान वामन परमात्मा स्वतःचे तीन पावलं भूमी मोजून घेतात एका पावलामध्ये पृथ्वी दुसऱ्या पावलांमध्ये ब्रम्हलोक आणि तिसरा पाय बळीचा मस्तकावर ठेवतात. राजा बळीला पाताळामध्ये सुतळ लोकांचं राज्य देतात. आपत्तीमध्ये प्रभू स्मरण करणारा गजेंद्र आहे आणि सर्व संपत्ती प्राप्त होऊन प्रभू स्मरण करणारा राजा बळी आहे. पितृ तिथीला वामन चरित्र जर वाचलं तर आपल्या पित्रांना शांती मिळते.भागवतात राम कथा संक्षिप्त आहे.भागवत श्रीकृष्ण परमात्म्याची वांग्मयीन प्रतिमा आहे. कृष्णचरित्र गाताना ऐकताना प्रेमाची गरज आहे.
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम/
ऐसे देई प्रेम काही कळा//
वसुदेवजी शुद्ध चित्त आहे देवकी माता निष्काम बुद्धी आहे यांच्याउदरी श्रीकृष्ण परमात्मा अवतरीत होतात.राम अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा हा पुष्टी पुरुषोत्तम अवतार आहे. साधक कसा असावा राम चरित्र शिकवत देव कसा आहे कृष्णचरित्र सांगते. मोक्षासाठी कृष्ण कथेत तन्मय झाले पाहिजे.
वसुदेवसुतं देव कंस चांणुर मर्दनम देवकी परमानंदं कृष्ण मंदिर जगद्गुरुम//सर्वांना आनंद देणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे श्रावण वद्य अष्टमी रात्री बारा वाजता कारागृहामध्ये मथुरेमध्ये प्रगट होतात आणि श्रावण वद्य नवमी पहाटे गोकुळामध्ये नंद महोत्सव सुरू होतो अशाप्रकारे चतुर्थ दिवसाची कथा कृष्ण जन्म प्रगट्य साजरा करून आनंदामध्ये संपन्न झाली.

Previous articleपरकीय व नगदी चलन मिळून देणाऱ्या द्राक्ष पिकांचे गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान–
Next articleजिल्हाधिकारी कार्यालयावर ९ डिसेंबरला उलगुलान महामोर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here