Home नाशिक परकीय व नगदी चलन मिळून देणाऱ्या द्राक्ष पिकांचे गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान–

परकीय व नगदी चलन मिळून देणाऱ्या द्राक्ष पिकांचे गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान–

66
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_104046.jpg

परकीय व नगदी चलन मिळून देणाऱ्या द्राक्ष पिकांचे गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान–

राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ.उमेश काळे व मा सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

बेमोसमी पाऊस व गारांच्या तडाख्यामुळे द्राक्ष पंढरीला हैराण केले असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून मायबाप सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी द्राक्ष पंढरीतील तमाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे ‌.
या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांची स्वीय सहाय्यक डॉक्टर उमेश काळे व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई जगताप यांनी विंचूर, थेटाळे, वनसगाव ,खानगांव, सारोळे खुर्द कोटमगाव आधी गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये रविवारी वादळी वा-यासह पाऊस व गारपीटीमुळे या तालुक्यातील असंख्य गावातील अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर,थेटाळे, वनसगाव, कोटमगाव, खानगाव, सारोळे खुर्द या गावांनाही काल झालेल्या गारपिटीचा प्रचंड फटका बसला. या परिसरातील प्रामुख्याने द्राक्ष बागा, फळबागा तसेच टोमॅटो, कांदा रोपे ,गहू ,हरभरा ,भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी यावेळी आपल्या व्यथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ.उमेश काळे , मा सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांच्याकडे मांडल्या. लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. गारपीट, अवकाळी पाऊस, कोरोना या कारणामुळे अनेक वेळा नुकसान झाले आहे. परंतु या वेळेस झालेल्या गारपीटीमळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
यावेळी मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे, संजय शेवाळे, काका दरेकर, कैलास सोनवणे,भाऊसाहेब गांगुर्डे, डॉ योगेश डुंबरे,बापू दरेकर, ज्ञानेश्वर शिंदे, सोनाली शिंदे,सागर शिंदे, इत्यादींनी नुकसान झालेल्या शेतपिकांची समक्ष जाऊन पाहणी केली.

@ डॉ उमेश काळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांच्या माध्यमातून दिले. यावेळी त्यांनी तत्सम तलाठी, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शंभर टक्के पंचनामे करून ते शासन दरबारी सादर करावेत असे आदेश दिले.सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

सौ सुवर्णाताई जगताप
मा सभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस

@ निफाड तालुक्यातील सोनेवाडी, शिवडी, उगाव, वनसगाव, रानवड, कोठुरे, कोळवाडी, निफाड,नैताळे,सारोळे खुर्द परिसरातील द्राक्ष पंढरीला अस्मानी सुलतानी गारपीट व पावसाचे संकट यात द्राक्ष कांदे टोमॅटो पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतावर असलेले बँकांचे कर्ज वाढत चाललेले असुन शेती कशी उभी करावी यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच प्रश्न पडतो? तरी शेतकरी शेतमाल पिकवण्यासाठी खाजगी सावकार तसेच सोने गहाण ठेवून शेतातील पिके उभे करत आला आहे. आता शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय नाही तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. शासनाने यासंदर्भात शेतकऱ्यांना मदतीचा हात नाही दिला तर निफाड तालुका नेहमी कॅलिफोर्निया म्हणून शेती क्षेत्रात प्रसिद्ध आहे. एकंदरीत नुकसानीचा विचार करता शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच मायबाप सरकारची मागणी….

बाबुराव पाटील सानप
चेअरमन शिवडी विकास संस्था सोनेवाडी

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने बहुरूपी व उपेक्षीत समाजासोबत साजरी केली दिवाळी
Next articleभक्ती ,ज्ञान ,वैराग्य परिपूर्ण करणारी भागवत महापुराण कथा—भागवत कथाकार ह भ प राजेंद्र महाराज चव्हाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here