Home परभणी “दुधना नदी’ संवाद यात्रेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

“दुधना नदी’ संवाद यात्रेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

174

आशाताई बच्छाव

IMG-20221015-WA0082.jpg

“दुधना नदी’ संवाद यात्रेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी,  :- जल बिरादरी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने चला जाणून घेऊया नदीला या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दुधना नदी संवाद यात्रेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जल कलश आणि राष्ट्रध्वज वितरण करून करण्यात आले.
यावेळी भुजल सर्वेक्षण अधिकारी प्रशांत पौळ, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रकांत गांगुर्डे, अरविंद लोणकर, किरण मोहोळ, विकल्प संस्थेच्या लता साळवी आणि विद्यार्थी/विद्यार्थींनी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या नदी संवर्धनाचे महत्व व जबाबदारीची जाणीव जनतेला करुन देणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून यामध्ये गावपातळीवर जिल्हा प्रशासन पण आवश्यक ते सहकार्य करेल.
यावेळी जल कलश रमाकांत बापू यांनी व राष्ट्रध्वज सारंग साळवी यांनी स्वीकारला.

Previous articleसततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करावे – पालकमंत्री तानाजी सावंत
Next articleसीईओ पदाचा पदभार रश्मी खांडेकर यांच्याकडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.