Home परभणी सीईओ पदाचा पदभार रश्मी खांडेकर यांच्याकडे

सीईओ पदाचा पदभार रश्मी खांडेकर यांच्याकडे

275

आशाताई बच्छाव

IMG-20221015-WA0069.jpg

सीईओ पदाचा पदभार रश्मी खांडेकर यांच्याकडे

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी:- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी सायंकाळी महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य हमी योजना मुंबई या पदावर नियुक्ती केली. पाठोपाठ त्या ठिकाणी 17 ऑक्टोंबर रोजी रुजू व्हावे, असे निर्देश देवून परभणीतून कार्यमुक्त केले. या रिक्तपदी विभागीय आयुक् कार्यालयाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांची नियुक्ती केली. उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी या अनुषंगाने आदेश लागू केला आहे.

Previous article“दुधना नदी’ संवाद यात्रेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleमा. तुकाराम मुंडे आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान. यांना इमेल द्वारे पाठवीले पत्र!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.