Home मुंबई गृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनाला

गृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनाला

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0028.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनाला! देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये लालबागच्या दर्शनाला आलेले आहेत .अमित शहा यांनी सहकुटुंब नातवांसह लालबागचा दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते . इतर भाजपाचे नेतेही उपस्थित होते .अमित शहा यांना कडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा नातू व त्यांची पत्नी ही उपस्थिती लक्षणीय ठरली. लालबागच्या राजाचे दर्शन झाल्यानंतर ते वांद्र्याकडे रवाना झाले . त्यांनी सांगितले की माझ्यासाठी लालबागचा दर्शन खूप महत्त्वाचा आहे .वांद्रे कडे जाण्यासाठी आशिष शेलार यांच्या मतदारसंघात ते गणपती दर्शन घेणार आहे. या मुंबई दौऱ्यामध्ये अमित शाह यांनी मिशन मुंबईसाठी दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर भाजप व शिंदे गटाला अनेक कानमंत्र दिले जातील असे सांगण्यात येत आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई कोअर कमिटी देखील ते मार्गदर्शन करणार आहे. पहिली बैठक ही मुंबईमध्ये हवी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामध्ये मुंबई कोअर कमिटी साठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या बंगल्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकाबद्दल ही चर्चा होणार आहे .एकंदरीत काय कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी, याचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे . मुंबईतील प्रत्येक मोठे नेत्यांना आपापले जबाबदारी देऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. एकंदरीतच काय तर गणपती दर्शना बरोबर निवडणुका हेही ध्यानात घेऊन अमित शहा हे मैदानात उतरले आहेत हे नक्की.

Previous articleपिंपळे गुरव येथील गजराज मित्रमंडळाचा गणेशोत्सव जल्लोषात
Next articleहिसवऴ येथिल दत्त मदिरास क वर्ग परीयटन क्षेत्र दर्जा मिऴवुन देण्यासाठी आमदर सुहास कांदे प्रयत्न करणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here