Home पुणे पिंपळे गुरव येथील गजराज मित्रमंडळाचा गणेशोत्सव जल्लोषात

पिंपळे गुरव येथील गजराज मित्रमंडळाचा गणेशोत्सव जल्लोषात

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0032.jpg

नवी सांगवी प्रतिनिधी उमेश पाटील: पिंपळे गुरव येथील गजानन नगरमध्ये गजराज मित्र मंडळाच्यावतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी मंडळाच्या वतीने शंकराची जटा व तिसऱ्या डोळ्याची प्रतिकृती उभारून देखावा सादर केला आहे. मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही टाळ मृदुंगाच्या गजरात झिम्मा, फुगडी, खेळ खेळत गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे पिंपळे गुरव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा मात्र सर्व निर्बंध हटविल्यामुळे पिंपळे गुरव परिसरात गणेशोत्सव थाटामाटात व जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मंडळाच्या वतीने परिसरातील बालगोपाळ, तरुण वर्ग, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंडळाने भव्य मंडप उभारला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. दररोज मंडपा समोर विविध रंगांची उधळण करून रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात येते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सतत आकर्षित करीत असतात. मंडळाने यावर्षी नंदिवर विराजमान झालेल्या गणेशाची सुंदर, मनमोहक अशी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी परिसरातील तरुणांनी एकत्रित येऊन पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. मंडळाने गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करीत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
मंडळात सर्वाधिक महिलांचा सहभाग असतो. मुलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मंडळ सातत्याने पुढाकार घेऊन रांगोळी, चित्रकला, मेहंदी, वक्तृत्व, हस्ताक्षर, स्लो सायकलिंग, पोत्यात पाय घालून चालणे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस आदी स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. स्पर्धेतील विजेत्यांना व सहभाग घेणाऱ्या मुलांना बक्षीस वाटप केले जातात. मंडळाची भव्य मिरवणूक सालाबादप्रमाणे यंदाही परिसरातील नागरिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेताना दिसून येत आहेत.

Previous articleपाळज येथे पुरुषोतम महाराज बुलढाणेकर यांच्या किर्तनाचे आयोजन
Next articleगृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनाला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here