• Home
  • यावल मध्ये धक्कादायक घटना! एका दाम्पत्याने केली आत्महत्या ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

यावल मध्ये धक्कादायक घटना! एका दाम्पत्याने केली आत्महत्या ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 यावल मध्ये धक्कादायक घटना! एका दाम्पत्याने केली आत्महत्या 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव:⭕ जिल्ह्यातील यावल शहरात एका दाम्पत्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याने खळबड उडाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

भागवत उर्फ बाळु डिगंबर पाटील (वय61) आणि विमलबाई भागवत पाटील (वय 54) अशी मृतांची नावं आहे. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास पाटील दाम्पत्याने मार्निंग वॉकला जात आहे, असे सांगून घरातून बाहेर निघाले होते.

घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर दूर हे दाम्पत्य चालत गेले. त्यानंतर फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेवून आत्महत्या केली.
सदरील प्रकार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या निर्दशनास आला. त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

भागवत पाटील आणि विमलबाई पाटील या दोघांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे…⭕

anews Banner

Leave A Comment