Home नाशिक नाशिक पंचवटी येथील वेदिका वृद्धाश्रमातील 21 कर्तुत्ववान महिलांचा गुरु आराध्या फाउंडेशन च्या...

नाशिक पंचवटी येथील वेदिका वृद्धाश्रमातील 21 कर्तुत्ववान महिलांचा गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने सन्मान

91
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_200440.jpg

नाशिक पंचवटी येथील वेदिका वृद्धाश्रमातील 21 कर्तुत्ववान महिलांचा गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने सन्मान

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

गुरु-आराध्या” फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने नाशिक मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
वेदिका वृद्धाश्रम,पंचवटी नाशिक येथील आजी-आजोबा यांच्या सोबतच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील 21 कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह / ट्रॉफी व गुलाबपुष्प संस्थेच्या अध्यक्षा-डाॅ.सौ.अर्चनाताई आहेर.गणोरेकर तसेच संस्थेचे सचिव – प्रा.ललित खैरनार यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार घेणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना मध्ये दिप्ती मोरे, मनिषा बोरसे,रचना चिंतावार, संगिता माळी,अनिता धामणे,स्वाती कोठावदे,कल्पना दुशिंग, मेघा देवरे,मंजुषा ढुंमणे,छाया कोठावदे, मनिषा गवळी, वृषाली बच्छाव, सुनिता बाविस्कर, मयुरी शुक्ला, सुरेखा मैंद,रिंकू पाटील,प्रिती म्हस्के,स्वाती आहेर,प्राची राव, सिमा भांडे, सोनाली बिरारी या कर्तृत्ववान महिला होत्या व वेदीकाश्रम मधील आजी-आजोबा यांचाही यथोचित सत्कार केला.
डॉ.अर्चनाताई यांनी तेथील आजी-बाबांसाठी वृद्धाश्रमात उरलेलं जिवन व जीवनातील प्रत्येक दिवस आनंदात कसा घालवायचा तसेच भूतकाळात जास्त डोकावण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्यात कसे आनंदी राहता येईल यांवर मार्मिक व आध्यात्मिक विचार मांडले व तसेच कर्तृत्ववान मैत्रिणींसाठी प्रेरणादायी विचार देखील मांडले.प्रा. ललित खैरनार सरांनी विविध प्रकारचे गेम घेत सर्वांना खूप हसविले व सर्वांचाच आनंद द्विगुणित केला.एकंदर या कार्यक्रमातुन प्रत्येकाच्या जीवनाला नविन कलाटणी मिळाली.
्नंतर वृद्धाश्रमातील वृद्ध महिला यांना साडी , तसेचं पुरुषांना कपडे वाटप व सोबतच फरसाण, बिस्कीट, लाडू वाटप करण्यात आले. याबरोबर सोबत मनसोक्त गप्पा मारुन, त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण दूर करत, संपूर्ण दिवस आनंदात घालवला. त्यांनी आम्हांला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला.
वेदिका वृद्धआश्रम संचालक श्री.विलास पाटील , मॅनेजर प्रशांत सर व स्टाफ यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला व त्यांचे सहकार्य लाभले.संपूर्ण “गुरु-आराध्या फाऊंडेशनची” टीम उपस्थित होती.सर्वांचे सहकार्य लाभले.यामुळे वृद्धाश्रमातील आजी-बाबाची सेवा झाली.त्यांचे प्रेम व आशीर्वाद लाभला, त्यांच्या व सर्व मैत्रिणींच्या जीवनात आनंदाचा गारवा देण्याचा “गुरु -आराध्या” फाऊंडेशनचा प्रयत्न यशस्वी झाला.संस्थेच्या वतीने दरवेळी विविध उपक्रम सामाजिक हितासाठी राबविण्यात येत असतात त्यात रंगपंचमी, होळी या सणातून आजी-आजोबा यांना आनंदाचा रंग लावला व महिला दिनाच्या निमित्ताने एक सुंदर उपक्रम यशस्वी पार पडला.

Previous articleरंगी रंगला श्रीरंग -भरवस ला अवतरली देहू नगरी
Next articleश्रीरामपूर येथे लाखो रुपयांची दारू जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here