Home Breaking News नवी मुंबई विमानतळाला महानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव द्या – गोर सेना

नवी मुंबई विमानतळाला महानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव द्या – गोर सेना

113
0

नवी मुंबई विमानतळाला महानायक
वसंतरावजी नाईक यांचे नाव द्या – गोर सेना

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक व नवी मुंबईचे निर्माते तथा सिडकोचे शिल्पकार वसंतरावजी नाईक यांचे कर्तृत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे.

महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करीत असतांना त्यांनी मोठ्या दृष्टीने नवी मुंबईची पायाभरणी व उभारणी केली. तत्कालीन विरोधी पक्षांनी नवी मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शविला होता,परंतु दूरदृष्टी असणारे विकासाचे महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी नवी मुंबई उभारली,हे देशभर सर्वश्रुत असतांना त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतरावजी नाईक नाव देणे अतिशय समर्पक आणि उचित ठरेल.

आधुनिक महाराष्ट्राला घडविणाऱ्या वसंतरावजी नाईक साहेबांच्या सन्मानार्थ भरीव आणि ऐतिहासिक असे आजवर काहीही दिसून आलेले नाही,हे दुर्दैवी आहे.वसंतरावजी नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष अंतर्गत प्रस्तावित अनेक बाबी आजही प्रलंबित आहेत, हे अतिशय खेदाने म्हणता येईल.सद्या सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादावरून नवी मुंबई निर्मात्याचेच नाव डावलून इतर लोकांचे नाव पुढे केले जात आहे,याबद्दल नाईक साहेबांच्या अनुयायासह ओबीसी मागासवर्गीय, गोर बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता आहे.येत्या १ जुलै रोजीच्या कृषी दिन (वसंतराव नाईक जयंती) या पावनपर्वावर नाईक साहेबांच्या नावाने याबाबतीत घोषणा व निर्णय होतील,अशी आपनांकडून अपेक्षा आहे.’नवी मुंबईचे निर्माते तथा सिडकोचे शिल्पकार असलेले हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देऊन त्या विमानतळाचे वसंतरावजी नाईक नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी मुखेड गोर सेनेच्या वत्तीने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री महोदयाकडे केली आहे.

यावेळी विजय जाधव (गोरसेना तालुका अध्यक्ष),वसंत जाधव (गोरसेना तालुका उपाध्यक्ष),बबलू चव्हाण (गोरसेना
ता.संघटक),किरणभाऊ चव्हाण
( गोरसेना शहराध्यक्ष ),बालाजी राठोड
( गोरसेना सर्कलाध्यक्ष जाहुर तथा प्रहार तालुका उपाध्यक्ष,मुखेड ), वसंत चव्हाण (गोरसेना शाखा अध्यक्ष वसुर तांडा), सुशील राठोड ( राजुरा तांडा ),बालाजी राठोड ( शेरी तांडा ) यांच्या सह आदी जनांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here