Home Breaking News ओबीसी आरक्षणावरील स्थगती हे महाविकास आघाडी सरकारचे महापाप कार्यसम्राट आ.डॉ.तुषार राठोड..बीसी के...

ओबीसी आरक्षणावरील स्थगती हे महाविकास आघाडी सरकारचे महापाप कार्यसम्राट आ.डॉ.तुषार राठोड..बीसी के सम्मान में..! भाजपा मैदान में….!! नारेबाजीच्या जयघोषाने मुखेड शहर दणाणले…

182
0

ओबीसी आरक्षणावरील स्थगती हे महाविकास आघाडी सरकारचे महापाप कार्यसम्राट आ.डॉ.तुषार राठोड..बीसी के सम्मान में..! भाजपा मैदान में….!! नारेबाजीच्या जयघोषाने मुखेड शहर दणाणले… मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा ओबीसी समाजाचा इम्पोरियला डाटा मागूनही महाविकास आघाडी सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयात डाटा सादर केला नसल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झाली आहे.दि. ४ मार्च, २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘विकास किशनराव गवळी वि. महाराष्ट्र सरकार (रिट याचिका क्र. ९८०/२०१९) या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरविले. याबाबतची राज्यसरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दि.२८ मे रोजी फेटाळली आहे.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण त्वरित परत मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा करून ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावेत या मागणीसाठी मुखेड तालुक्यातील तालुक्यातील हजारो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत मुखेड भाजपाच्या वतीने कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नर्सी नाका येथील राज्य महामार्गावर तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी समाजाचा इम्पोरियला डाटा जमा न करता ओबीसी समाजाचा विश्वास घात करून ओबीसी समाजाची दिशाभूल करत समाजाचे राजकीय असतित्व धोक्यात आणले आहे.

महाराष्ट्र सरकार आणि विशेषत:ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून या बाबत उपस्थित ओबीसी बांधवांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केले महाराष्ट्र सरकारने त्वरित ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी उपस्थितांनी केली आहे.अन्यथा यापुढेही राज्यभर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदारा मार्फत सरकारकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपा मुखेड तालुकाध्यक्ष डॉ.वीरभद्र हिमगिरे,भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर,अॅड खुशाल पाटील उमरदरीकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर,राजू घोडके (माजी पं.स.सदस्य) डॉ.गोपाळ पाटील धनजकर,शिवाजी पाटील होडगिरे जामखेड,विलास पाटील राजूरकर,गणेश पाटील जाधव,नासरखान पठाण,गौतम काळे (रिपाई जिल्हाध्यक्ष नांदेड ),
किशोरसिंह चव्हाण
(भाजपा शहराध्यक्ष ),राजु रनभिडकर,
शिवकुमार बंडे,गंगाधर देवकत्ते मंडलापूरकर,समिर गजगे,सुधीरभाऊ चव्हाण ( सोशल मिडीया प्रमुख),किरण रोडगे,विनोद दंडलवाड यांच्या समवेत हजारो ओबीसी समाज बांधवासह भाजपाचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Previous articleनवी मुंबई विमानतळाला महानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव द्या – गोर सेना
Next articleआयडियल इंग्लिश स्कूल देगलूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती उत्सवात साजरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here