Home Breaking News आयडियल इंग्लिश स्कूल देगलूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती...

आयडियल इंग्लिश स्कूल देगलूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती उत्सवात साजरी.

162
0

आयडियल इंग्लिश स्कूल देगलूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती उत्सवात साजरी.
मुखेड तालुका प्रतिनिधी ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलूर ता देगलूर जि. नांदेड येथे छ. शाहू महाराज यांची 147 वी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली. यावेळी फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सोनकांबळे मारोती लक्ष्मणराव यांनी छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. व त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन केले. तसेच यावेळी संस्थेचे उपअध्यक्ष सुनंदा मारोती सोनकांबळे , स्कूल चे मॅडम ममता मॅडम, सुनंदा मॅडम, समीक्षा सोनकांबळे, भक्ती म्याकलवार, आशिष वाघमारे, संदीप गणपत दिंडे, व इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. सोनकांबळे सरानी छ. शाहू महाराजांच्या जीवन चरितत्रा विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच छ. शाहू महाराजांनी केलेले शैक्षणिक कार्य, शेतकरयांना महत्त्व देऊन त्याना येणाऱ्या समस्यचे निराकरण केले. गुळाची बाजारपेठ, पाण्याचे धरण, विद्यार्थ्यांना शिकक्षणासाठी शाळा, कॉलेज, वसतिगृह, निर्माण करून कर्तत्वान पिढी निर्माण केली. आपल्या दरबारात जात, धर्म, पंथ यावर आधारित कुठलीही विषमता न मानता त्यांनी प्रत्येक जातीतील तरुणांना रोजगार दिले. ते खरे दूरदृष्टीचे राजे, नेते, पुढारी, समाज सुधारक, मोठ्या मनाचे दिलदार, स्वाभिमानी, समतावादी, वास्तविक परिवर्तन घडून आणणारे युगप्रवर्तक होते. ज्यांच्या सहवासाने पुढील काळात भारत देशाची मान जगात मोठ्या अभिमानाने उंचावली लोकशाही रूढ झाली हे काम वास्तवात येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना छ. शाहू महाराजांनी मोलाचे सहकार्य केले. माणगाव परिषद1920 साली स्वतः अध्यक्ष पद भूषवून डॉ. बाबासाहेबांचे गुणगौरव, कौतुक करून हेच खरे तुमचे उधारकर्ते आहेत असे जाहीर केले. असे हे व्यापक मनाचे महान छत्रपती ,राजे, नेते, पुढारी समाजसुधारक होते. अशी सविस्तर मांडणी केली. आणि आजच्या नेत्यांनी ही दृष्टी अवगत करण्याची वेळ आली आहे . कारण आजच्या राजकारण उलट्या दिशेने धावत आहे. हे थांबण्याची जबाबदारी नवीन तरुण पिढीवर असल्याचे विचार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here