Home गडचिरोली आरमोरी तालुक्यातील सालमारा येथे वाघाने केला शेतकऱ्यास ठार।

आरमोरी तालुक्यातील सालमारा येथे वाघाने केला शेतकऱ्यास ठार।

147

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0050.jpg

आरमोरी तालुक्यातील सालमारा येथे वाघाने केला शेतकऱ्यास ठार।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील एका इसमास वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली.सदर घटना ही दिं.29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास सरपण गोळा करण्यास जोगी साखरा जवळील शंकरनगर नाल्यालगत कक्ष क्र.47 च्या राखीव जंगलात आपल्या दोन सहकार्यासोबत गेले असता सरपण गोळा करत असतांना अचानक वाघाने हल्ला करून ठार केले.मृतकाचे नाव बळीराम शीवराम कोलते वय (47) वर्ष असुन रा. सालमारा तालुका आरमोरी असे आहे.

सदर घटनेची माहिती सोबत असलेल्या सहकार्यानी गावकर्यांना दिली व ग्रामस्थांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली.माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला.

परिसरात वांरवार होत असलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी सतत होत आहे.

Previous articleमहालक्ष्मी यात्रा उत्साहात
Next articleगणेश चतुर्थीच्या आगमना निमित्त शाहरातील सर्व रस्त्यातले खड़डे बुजविण्यात यावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.