Home कोल्हापूर महालक्ष्मी यात्रा उत्साहात

महालक्ष्मी यात्रा उत्साहात

182

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0044.jpg

महालक्ष्मी यात्रा उत्साहात

पेठवडगाव राहुल शिंदे: पेठ वडगाव येथील ग्रामदैवत महालक्ष्मीची पारंपारिक यात्रा कोरोना नंतर यावर्षी उत्साहात झाली. यात्रेत हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. देवी ची पूजा दीपक गुरव, विजय गुरव यांनी बांधली.अभिषेक विजय पोळ यांच्या हस्ते घालण्यात् आला.सकाळी माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या हस्ते आरती झाली.नंतर महाप्रसाद वाटप झाले. जय भवानी परिवार, बळवंतराव यादव हायस्कूल, नगरपालिका, विजयसिंह यादव कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता ठेवली.
विद्या पोळ यांच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आली यावेळी आमदार राजू बाबा आवळे, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गुरुप्रसाद यादव, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, सुनील हुकेरी, सुधीर पोळ, राजकुमार पोळ, अभिजीत गायकवाड, आदी उपस्थित होते.दरम्यान यादव कॉलनी मधील कर्नाटकी अंबाबाई मंदिरात धनाजी पाटील, सचिन पाटील, तसेच वेंकटेश्वर ग्रुप तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले.तुकाई मंदिरात ही महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Previous articleकाँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत
Next articleआरमोरी तालुक्यातील सालमारा येथे वाघाने केला शेतकऱ्यास ठार।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.