Home गडचिरोली काँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत

काँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत

113

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0043.jpg

काँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत

पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. हे कुणीही नाकारु शकत नाही. भ्रष्टाचारविरोधी आपण लढा देऊ म्हणणारे आता सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडू लागले आहे. सातत्याने महागाई वाढत असतानाही आम्ही भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या बाता करित सामान्य नागरिकांची दिशाभूल करित आहेत. सर्वच क्षेत्रात यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. सामान्य जनतेला काँग्रेसच न्याय देऊ शकते, असा विश्वास आजही जनतेला आहे. आपण सेवा काळात कोणत्याही पक्षाशी जुळलो नव्हतो. मात्र, सेवानिवृत्तीनंतर सध्या सुरू असलेली सत्ताधाऱ्यांची दडपशाही लक्षात घेऊन आम्ही काँग्रेसची विचार स्विकारत आहोत. काँग्रेसची विचारधाराच सामान्य जनतेला न्याय देऊ शकते, असे मत काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी मदन टापरे, नगर परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश धकाते, व्यावसायिक रुपेश नांदनकर यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
सोबत प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतिश विधाते, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, भावना वानखेडे, रुपाली पंदिलवार, राजनिकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, दीपक मडके, सुनील डोग्रा, राजाभाऊ कुकडकर, वसंत राऊत, काशिनाथ कोडापे, लता मुरकुटे, आशा मेश्राम, बाळू मडावी, माजीद सय्यद, जावेद खान, मिलिंद बारसागडे सह अनेक काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleवरूणजी सरदेसाई साहेब युवासेना सचिव तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश दादा कदम यांचे गडचिरोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत
Next articleमहालक्ष्मी यात्रा उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.