Home औरंगाबाद गणेश चतुर्थीच्या आगमना निमित्त शाहरातील सर्व रस्त्यातले खड़डे बुजविण्यात यावे राष्ट्रवादी काँग्रेस...

गणेश चतुर्थीच्या आगमना निमित्त शाहरातील सर्व रस्त्यातले खड़डे बुजविण्यात यावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0052.jpg

गणेश चतुर्थीच्या आगमना निमित्त शाहरातील सर्व रस्त्यातले खड़डे बुजविण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन

औरंगाबाद ,(बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) :- औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अतिरिक्त आयुक्त यांना गणेश चतुर्थीच्या आगमना निमित्त औरंगाबाद शहरातील सर्व रस्त्यातले खड्डे बुजविण्यात यावे तसेच इतर समस्या सोबत निवेदन देण्यात आले. पावसामुळे औरंगाबाद शहरातील प्रत्येक रस्त्यात मोठ-मोठे खड्डे झाले असुन येत्या दोन दिवसात गणेश चतुर्थी निमित्त गणरायाचे
आगमन होत आहे, यासाठी भाविकांना गणरायाचे स्थापना करत असताना यावेळी रस्त्यात पड़लेल्या खड्यांमुळे जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.करीता लवकरात लवकर औरंगाबाद शहरात असलेल्या रस्त्यां मधील खड्डे हे मुरुम टाकुन बुजविण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे रस्त्यातील खड्यामध्ये बेशरमांची रोप लावुन मनपाचा निषेध करण्यात येईल.
असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.

 

औरंगाबाद पूर्व विधानसभेत तर्फे देखील नियोजन सादर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद पूर्व विधानसभेतर्फे औरंगाबाद शहर जिल्ह्याचे अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाने पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान यांनी अतिरिक्त आयुक्त नेमाने यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये गणरायाच्या स्थापनेच्या वेळी मूर्ती घेऊन येत असताना जर खड्ड्यामुळे अपघात घडला आणि मूर्तीची विटंबना झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न अतिरिक्त आयुक्तांना विचारल्यावर त्यांनी असा कोणताही प्रकार घडणार नाही खड्डे त्वरित मनपाच्या वतीने बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले

निवेदनाच्या वेळी प्रमुख उपस्थित :– राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, कोषाध्यक्ष अय्युब खान, औरंगाबाद राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब मुन्ना भाई, पुर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद नवाज खान,युवा शहर अध्यक्ष मयुर सोनवणे, युवा शहर कार्याध्यक्ष शेख कय्यूम, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, अनिल विधाते माजी नगरसेवक, माजी नगरसेवक अश्फाक कुरैशी,शहर उपाध्यक्ष अशोक बंसवाल, शेख कलीम पुर्व विधानसभा सचिव,फेरोज खान पुर्व विधानसभा सहसचिव,साजीद शेख,असदउल्ला तर्रार आदींची उपस्थिती होती.

Previous articleआरमोरी तालुक्यातील सालमारा येथे वाघाने केला शेतकऱ्यास ठार।
Next articleआमदार जितेश दादा अंतापुरकर यांची वझरगा येथील “राजयोग” निवासस्थानी नागरीकांशी सदिच्छा भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here