Home नाशिक रंगी रंगला श्रीरंग -भरवस ला अवतरली देहू नगरी

रंगी रंगला श्रीरंग -भरवस ला अवतरली देहू नगरी

115
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_200023.jpg

रंगी रंगला श्रीरंग -भरवस ला अवतरली देहू नगरी

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

भरवस तालुका निफाड येथील जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याच्या कार्यक्रमास उत्साह पूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून २ एप्रिल रोजी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सकाळी १० ते १२ हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली. दुपारी ३ ते ५ गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटी माऊली) यांनी आपल्या मधुर वाणीतून श्री तुकोबारायांचे चरित्र वाचन केले. तसेच सायंकाळी ६ ते ८ हरिभक्त परायण गाथामूर्ती ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली) यांचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पहिल्याच दिवशी नाशिक व नगर जिल्ह्यातून हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यामुळे कार्यक्रम परिसराला देहूचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेट देण्यासाठी श्री संत सोपानदेव संस्थान सासवड व श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान कोथळी, मुक्ताईनगर येत आहेत. आज बुधवार सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हभप आचार्य अर्जुन गुरुजी लाड, बीड यांचे कीर्तन संपन्न झाले.
सोहळ्याच्या प्रथम दिवशी भव्य कृषी प्रदर्शन, आरोग्य, सर्व रोगनिदान व उपचार शिबिरासह रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत शिरोमणी तुकोबारायांचे वंशज व देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली), व उपस्थित संत महात्म्यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कृषी, यंत्रसामुग्री, बचत गट उत्पादने, खाद्यपदार्थ, आरोग्य औषधी, रोपवाटीका आदी क्षेत्रात काम करणाऱ्या उत्पादकांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरात नाशिक जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल सेवा देत आहेत. तसेच समता ब्लड बँक नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे तर लासलगाव येथील कृष्णाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तुकोबारायांच्या देहू येथून आलेल्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठा शामियाना उभारण्यात येऊन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात नेमून दिलेले टाळकरी व विणेकरी ”तुकाराम – तुकाराम” नाम घोषाचा जप रात्रंदिवस करत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याची जय्यत तयारी चालू होती. नियोजन समितीने अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्यामुळे कार्यक्रम स्थळाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सोहळ्यासाठी नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आणि लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या देखरेखीखाली मुख्यालय नाशिक, निफाड उपविभाग व लासलगाव पोलीस स्टेशन येथून ५० पोलिसांची फौज गर्दी नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापन यासाठी सप्ताह काळात कार्यरत असणार आहे. निफाड नगरपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक दलाची गाडीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सप्ताह काळात तालुक्यातून हजारो स्वयंसेवक स्वईच्छेने सहभागी होऊन सेवा देत आहेत. नियोजन समितीच्या वतीने मुक्कामासाठी असलेल्या भाविकांसाठी यथोचित व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोहळ्यासाठी जवळपास १०० एकराच्या वर जागेचे व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात संपन्न—-
Next articleनाशिक पंचवटी येथील वेदिका वृद्धाश्रमातील 21 कर्तुत्ववान महिलांचा गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने सन्मान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here