Home नाशिक भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात संपन्न—-

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात संपन्न—-

62
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_195738.jpg

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात संपन्न—-

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024 रोजी 44 वा स्थापना दिन (वर्धापन दिन) भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांच्या नेतृत्वात तर भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ स्मिताताई कुलकर्णी, मंडल उद्योग आघाडी अध्यक्ष नितीन शर्मा, उपाध्यक्ष ॲड उत्तम नागरे यांच्या आयोजनात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला लासलगाव मंडल निवडणूक प्रमुख आर्कि अमृताताई पवार होत्या‌ तसेच प्रमुख पाहुणे प्रकाश दायमा होते. यावेळी भारतीय जनता पार्टी साठी अहोरात्र मेहनत घेणारे घराघरात भाजपा पोचवणारे जेष्ठ दिगग्ज व्यक्तींचा सत्कार करण्यात आला‌. यात लासलगाव येथील कट्टर जनसंघ ते हिंदुत्व कार्य करणारे बाळासाहेब होळकर (छत्र) ,विठ्ठल काका शिरसाठ यांच्या स्नुषा मंगलताई शिरसाठ, प्रकाश दायमा,मयूर झांबरे, प्रदीप माठा, बोडके काका यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना व शतप्रतिशत मतदान करण्याचे आवाहन मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी केले‌. 44 वर्षाचा भाजपा प्रवास जेष्ठ नेते तथा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर यांनी मांडला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर आधारीत देशातील सर्वात पहिला विरोधी पक्ष म्हणून एकात्म मानवतावाद या मुळ तत्त्वज्ञानाच्या आधारावर राष्ट्रनिष्ठा, लोकशाहीवरील निष्ठा, आर्थिक समता व सामाजिक न्याय सिध्दांतावरील निष्ठा, सर्वपंथ समभाव निष्ठा व मुल्याधारित राजनितीवरील निष्ठा या विचारांनी कार्यकर्त्यांनी कार्य केलेले आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार चा नारा देत होणाऱ्या कोणत्याही निवडणूक साठी भाजपा निष्ठावंत संघटनात्मक टीम सदैव सज्ज आहे‌. भारत माता की जय, वंदे मातरम ने परिसर दुमदुमून गेला. रवींद्र होळकर यांनी या निमित्ताने गोरगरीब लोकांना थंड उसाचा रस वाटप केला. यावेळी मंडल सरचिटणीस निलेश जगताप,रजनी कुलकर्णी,सचिन लचके,राजेंद्र सुरसे, संतोष पवार,संजय विळाजें, योगेश हिंगमीरे, गोपी गौड व इतर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleश्रीक्षेत्र शिवडी येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चांदीच्या पादुकांची मिरवणूक
Next articleरंगी रंगला श्रीरंग -भरवस ला अवतरली देहू नगरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here