• Home
  • *भारताचा क्रिकेट पट्टू सुरेश रैनाने मानले मोदींचे आभार*

*भारताचा क्रिकेट पट्टू सुरेश रैनाने मानले मोदींचे आभार*

*भारताचा क्रिकेट पट्टू सुरेश रैनाने मानले मोदींचे आभार*

*कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज*

ऐन तारुण्यात स्वतःला निवृत्त म्हणू नकोस. देशासाठी खेळताना दिलेले योगदान आजही आम्ही विसरलेलो नाही. तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा, असा संदेश नुकतीच निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैना याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवला. त्यावर तुमची शाबासकी मिळाली आता अजून काय हवे, धन्य झालो, अशा शब्दांत रैनाने मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यालाही शाबासकी देताना पत्र पाठवून त्याचे कौतुक केले होते. शुक्रवारी मोदी यांनी रैनालाही गौरवपत्र पाठवले. तू देशासाठी खेळताना जे योगदान दिले ते कधीच विसरता येणार नाही
मात्र, तू स्वतःला निवृत्त म्हणतोस हे पटत नाही. तू अद्याप खूप तरुण आहेस. क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असलीस तरीही पुढील आयुष्यात दुसरी इनिंग सुरू करशील व त्यासाठी तुला शुभेच्छा, असे आपल्या पत्रात पंतप्रधान मोदी यांनी रैनाचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी धोनीचे कौतुक केले होते. त्यानंतर रैनाच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप मारली. मोदींच्या कौतुकाला धन्यवाद देताना रैना अत्यंत भावनिक झाला होता. देशासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावतो. देशवासीयांकडून तसेच चाहत्यांकडून आम्हाला प्रेमही मिळते. पण खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकानंतर आता आम्हाला आणखी काही नको. खुद्द पंतप्रधानांनी कौतुकाने पाठ थोपटणे यातच मी धन्य झालो. जय हिंद, अशा शब्दांत रैनाने आपल्या भावना ट्‌विटरवर व्यक्‍त केल्या आहेत.
निवृत्ती घेतल्यामुळे आता धोनी आणि रैना भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना दिसणार नसले तरीही अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत त्यांचा खेळ पाहण्यासाठी चाहते आतूर बनले आहेत. ही स्पर्धा जरी रिकाम्या मैदानावर होणार असली तरीही त्याच्या थेट प्रक्षेपणाला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. ही स्पर्धा येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे.

anews Banner

Leave A Comment