Home Breaking News *विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यानी केले आभिनंदन*

*विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यानी केले आभिनंदन*

253

*विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यानी केले आभिनंदन*

*कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज*

भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू रानी रामपाल यांचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनसिंग पुरस्कार विजेत्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारने आज पाच खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी, तेरा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी, सत्तावीस क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, पंधरा खेळाडूंची ध्यानचंद पुरस्कारासाठी तर आठ खेळाडूंची तेनसिंग पुरस्कारासाठी निवड जाहीर केली.
या सर्व खेळाडूंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत घोडेस्वारीसाठी अजय सावंत, कुस्तीपटू राहूल आवारे, खोखोपटू सारिका काळे, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर, पॅरास्विमिंग सुयश जाधव यांची, तर ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आदी खेळाडूंचा समावेश असून यांच्यासह राज्यातील व देशातील सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.
पुणे येथील लक्ष्य इन्ट्यिट्यूट आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट या संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचंही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Previous article*रा.प.इचलकरंजी आगारात गणेशाचे आगमन*
Next article*भारताचा क्रिकेट पट्टू सुरेश रैनाने मानले मोदींचे आभार*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.