• Home
  • *रा.प.इचलकरंजी आगारात गणेशाचे आगमन*

*रा.प.इचलकरंजी आगारात गणेशाचे आगमन*

रा.प.इचलकरंजी आगारात गणेशाचे आगमन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर विभागातील
इचलकरंजी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती इचलकरंजीच्या वतीने
गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
इचलकरंजी आगारामधे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पण सद्या कोरोना संसर्गा मुळे सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाच्या तरूणांच्या जलोषावर कोरोनाचे सावट आले आहे.
नेहमीच प्रवाशांची सेवा करणारी महाराष्ट्राची लाडकी लोकवाहीनी लालपरीने आज गणराया विराजमान झाले. तसेच इचलकरंजी आगारातील गणेशाचे आगमन कोरोना मुळे साध्या पद्धतीने विना गाजत वाजत विराजमान करण्यात आले.
याप्रसंगी इचलकरंजी आगार एस.टी.कर्मचारी कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी आगाराचे व्यवस्थापक श्री संतोष बोगरे साहेब यांच्या हस्ते श्रींची पहिली आरती करण्यात आली. आगारातील गणेशोत्सव उत्साहात पार पडण्यासाठी श्री दीपक सवाईराम (वाहक) श्री किशोर डाके (वाहक) श्री निलेश होगाडे (वाहक) श्री जावेद बागवान (चालक) श्री गणेश फातले (वाहक) श्री विजय जानकर (वाहक) श्री निलेश माळी (वाहक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी इचलकरंजी आगार एस.टी.कर्मचारी कृती समितीच्या वतीने या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातुन मुक्त करून पुर्वी प्रमाणे आमच्या लालपरीला बळ येण्याचे गणरायाला साकडं घातले.

anews Banner

Leave A Comment