*श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ठेगोंडा*
*श्रीगणेश व गणपती मंदिर संदर्भात थोडक्यात माहिती व ख्याती*
*सटाणा,जयवंत धांडे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क*
*श्री सिध्दी विणायक गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात ठेगोंडा या गावी गिरणा नदीच्या तीरावर आहे मंदिराचा इतिहास फार जुना आहे साधारण १८९५ / साली मंदिराची स्थापना झाली मंदिराचा परिसर अतिशय सुंदर निसर्ग रमणीय आहे विशेष म्हणजे बागलाण तालुक्याचे दक्षिणेकडील प्रवेश द्वार श्री सिध्दी विणायक गणपती मंदिरापासून सुरू होते मंदिराशेजारी गिरणा नदी आहे नदीचे पात्र फार मोठे आहे नदीला नेहमी पाणी असते नदीला दरवर्षी पुर येतो १९६९ साली खुप मोठा महापुर आला होता त्या वेळी पुलाच्या वरुण पाणी गेले होते त्या वेळी पुरात झाडे झुडुपे वाहून गेले पुलाचा एक बाजुचा भाग तुटला होता परंतु भगवंताची लिला अगाध आहे येवढ्या मोठ्या महापुरात गणपतीची मुर्ती आहे तिथेच होती मंदिरातली घंटी दिवा साखळी महादेवाची पिंड आहे तिथेच होती म्हणजे देव आहे देव जागृत आहे त्या दिवसापासून श्रीगणेश गणपती बाप्पा हे जागृत देवस्थान आहे असे जनमानसात प्रसिद्ध झाले लोक नवस करू लागले गणपती बाप्पा नवसाला पाऊ लागले नतंर नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत अशी प्रसिद्धी मिळाली योगायोगाने ठेगोंडा येथे सूतगिरणी येणार म्हणून मोठमोठे आधिकारी येवू लागले असेच एके दिवशी दोन साहेब दर्शनाला आले गणपती चे पुजारी श्री माधवराव जोशी पुजा करून मंदिरात बसले होते दर्शन झाले आणि चौकशी अंती समजले ते साहेब सूतगिरणी चे बांधकामाचे काँन्ट्रेक्टर व अभियंता होते त्यांनी सूतगिरणीचे काम मिळावे म्हणून टेंडर भरले होते ते सहज बोलून गेले हे गणेशा गणपती बाप्पा तु भक्तांची अपेक्षा पुर्ण करतो आज जर आमचे टेंडर मंजूर झाले तर आम्ही नवीन मंदिर बांधकामासाठी व जीर्णोद्धार करण्यासाठी सढळ हाताने मदत करु श्री गणपती क्रूपेने त्यांचे टेंडर पास झाले त्याप्रमाणे ते शब्दाला जागले त्यांच्या मदतीने व देखरेखीने नवीन मंदिर झाले त्यानंतर दर्शनासाठी भक्तांची भावना वाढत गेली आणि दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी ला गणपती मंदिराजवळ यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले श्रावण महिन्यात गणपती मंदिराजवळ दरदिवशी श्री सत्यनारायण महापुजा असतात दरदिवशी सकाळ पासून लोक सत्यनारायण पुजेसाठी हजर असतात दरदिवशी कमीतकमी शंभर सत्यनारायण पुजले जातात दरदिवशी पहाटे श्री गणेशाची पुजा गणपतीचे पुजारी जोशी कुटुंबाकडे असते गेल्या तीन पिढी पासून जोशी कुटुंबाने गणपतीची पुजा साफसफाई देखरेख जबाबदारीने पार पाडले आहे आता मंदिराचे ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे मंदिराच्या अध्यक्ष पदी श्री यशवंतराव पंडितराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे व ते जबाबदारीणे कामकाज पहात आहेत त्यांना सहकारी म्हणून श्री मोतीलाल एकनाथ चौधरी हे महत्त्वाचे काम पाहतात व देखरेख करतात तसेच इतर ट्रस्टी सुध्दा काळजी पुर्वक जबाबदारीणे नेमून दिलेले काम करतात*
*१)श्री गणपती मंदिरात दरवर्षी माघ वद्य चतुर्थीला श्री गणेश याग ( यज्ञ ) केला जातो तसेच गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो मंदिरावर रोषणाई केली जाते तीन दिवस भजन किर्तन प्रवचन असते*
*२)दर महिन्याच्या अंगारकी चतुर्थीला ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदान केले जाते भाविक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी १० ते १५ किलोमीटर अंतरावरुन पाई येतात*
*३)नवसाला पावणारा देव म्हणून श्री सिध्दीविणायक गणपती मंदिराची ख्याती आहे*
