Home रत्नागिरी ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे येथे “हर घर तिरंगा” अभियान

ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे येथे “हर घर तिरंगा” अभियान

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0030.jpg

ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे येथे “हर घर तिरंगा” अभियान                                                          रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे ने गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून गरोदर आणि स्तनदा माता यांना विशेष मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतवडे येथे आयोजित केले होते.

त्याचबरोबर गावातील वय वर्ष तीन ते पाच वयोगटातील मुलांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित गरोदर माता व स्तनदा माता यांना स्तनपानाचे महत्त्व आणि पूरक व पोषक आहार याबाबत माहिती आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे च्या आरोग्य सेविका सौ.अनघा सुर्वे यांनी दिली. त्याचबरोबर आरोग्यवर्धिनीच्या सी. एच.ओ. कांबळे मॅडम यांनी गर्भसंस्काराबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे योग प्रशिक्षिका सौ. येकवडे मॅडम यांनी गर्भावस्थेमध्ये स्त्रियांनी कोणत्या प्रकारची योगासने करावीत आणि प्राणायाम कशा प्रकारे करावा याबाबत माहिती दिली.

यावेळी गावातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विविध पोषक व पूरक पदार्थांचे प्रदर्शन आयोजित केले गेले होते. नाचणी, मेथी, तांदूळ, मुग यासारख्या पोषक घटकांपासून खाद्यपदार्थ बनविले होते. अशा प्रकारचे पोषक पदार्थ गर्भवती महिलांनी व स्तनदा माताने ग्रहण केल्यास बालकांची शारीरिक सुदृढता वाढेल हा त्या पाठीमागील उद्देश होता.

या बरोबरच गावातील वय वर्ष तीन ते पाच वयोगटातील मुलांची सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. एकूण 18 बालके या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. वय, उंची, आरोग्य, शारीरिक सुदृढता, बोलण्याचे कौशल्य, ग्रहण क्षमता इत्यादी निकषाद्वारे स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. प्राविण्य प्राप्त बालकांना 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत तर्फे बक्षिसे दिली जाणार आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी कोतवडे गावचे सरपंच श्री तुफिल पटेल ग्रामपंचायत सदस्या सौ पायल पांचाळ, ग्रामपंचायत सदस्या सौ दिया कांबळे, आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडेच्या सी. एच. ओ. कांबळे, आरोग्य सेविका सौ अनघा सुर्वे, योग प्रशिक्षिका सौ येकवडे, पोलीस पाटील सौ. वैष्णवी माने, पोलीस पाटील सौ अस्मिता शिवलकर, महिला बचत गटांच्या सीआरपी सौ समृद्धी सोनार, सौ मयुरी भोसले, अशासेविका सौ लांजेकर, सौ जोगळेकर, सौ माने, सौ शितप त्याचप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस , गरोदर माता स्तनदा माता व बालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सरपंच तुफिल पटेल यांनी भारताची भावी सुदृढ पिढी घडवायचे काम सर्व माता-भगिनींवर आहे. सुदृढ व सुसंस्कृत मुले ही भारत देशाशी संपत्ती आहे. त्यामुळे गर्भसंस्कार महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे प्रसूतीनंतर बालकांचे पोषण हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. असे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत अंगणवाडी सेविका सौ बारगोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक अशा सेविका सौ जोगळेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

स्तनपान सप्ताह निमित्त गावातील गरोदर माता व स्तनदा माता यांना मार्गदर्शन आणि सुदृढ बालक स्पर्धा या उपक्रमांद्वारे हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात कोतवडे ग्रामपंचायत ने केली असून पुढे या अभियानामधील अनेक उपक्रमाची मालिका ग्रामपंचायतीतर्फे राबविली जाणार आहे.

Previous articleगणपतीपुळे येथे स्वच्छता अभियान
Next articleलोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here