Home नाशिक सारोळे खुर्दला आज 151 ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता महापर्व सोहळा व पवित्र मेळा

सारोळे खुर्दला आज 151 ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता महापर्व सोहळा व पवित्र मेळा

204
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_065435.jpg

सारोळे खुर्दला आज 151 ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता महापर्व सोहळा व पवित्र मेळा

दुपारी १ वाजता वारकरी महामंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे निफाड

महाशिवरात्रीच्या महापर्व कालावरती श्री क्षेत्र सारोळे खुर्द येथे विजया एकादशीच्या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थ आयोजित गावातील 151 ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता महापर्व सोहळा व पवित्र ज्ञानयज्ञ सोहळा गुरुवार 7 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता गावातील समस्त ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आव्हान समस्त ग्रामस्थ, सरपंच ,उपसरपंच, सदस्य मंडळ, चेअरमन , व्हा चेअरमन, संचालक मंडळ तंटामुक्ती अध्यक्ष ,ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष ,सचिव ,समिती सांप्रदायिक युवक भजनी मंडळ, शालेय समिती आदींनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रति जेजुरी खंडोबा राया मंदिर पाचोरे वणी चे संस्थापक ह भ प योगेश महाराज गवारे असून कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून निलेश जी गाढवे अध्यक्ष संत श्री निवृत्तीनाथ दादा मंदिर ट्रस्ट त्र्यंबकेश्वर, एडवोकेट सोमनाथ घोटेकर सचिव संत श्री निवृत्तीनाथ दादा मंदिर ट्रस्ट त्रंबकेश्वर ,संतोष जी टिळेकर राष्ट्रपती पुरस्कार विजेते, आत्माराम साहेब टोल नाका इन्चार्ज त्याचबरोबर उदयसिंह राऊत भुजबळ साहेब पी एस, ईश्वर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, महेश पाटील गटविकास अधिकारी, बाळासाहेब शिरसागर सभापती मविप्र, डी के नाना जगताप, भाऊसाहेब भवर वारकरी मंडळ तालुका अध्यक्ष, प्रकाश शेठ दायमा ,गणेश डोमाडे, सुवर्णाताई जगताप माजी सभापती लासलगाव बाजार समिती, विशाल नाईकवाडे, पंढरीनाथ थोरे, ह भ प विठ्ठल आण्णा शेलार ,बाबासाहेब डमाळे व बबनराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारी १२ वाजता जयराम हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व आरोग्य निदान शिबिर व दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ निफाड तालुका आयोजित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी पुढील मान्यवरांचा यथोचित सन्मान होणार आहे
जनार्दन कासार उपजिल्हाधिकारी ,अनुप वंसे सचिव मंत्रालय ,समीर भोसले, प्रतीक भोसले, सिद्धेश जेऊघाले, केशव डुकरे, विनोद डुकरे ,निशिगंधा भोसले, दर्शन भरत जाधव, नंदकिशोर दिनकर घोरपडे ,अश्विन शांताराम केदारे,(डॉक्टर) गायत्री संजय भोसले ,अनिकेत राजाराम गवंडे, शशिकांत बाळासाहेब भोसले ,कावेरी संजय भोसले, (आयटी कंपनी) त्याचबरोबर चेतन जेऊघाले, प्रवीण भोसले, अभिषेक भोसले, हर्षद भोसले, अतुल बाळासाहेब भोसले, शशिकांत भोसले, प्रशांत भोसले, भूषण कडाळे ,विलास एळवंडे, सुदर्शन घोरपडे, मयूर घोरपडे, मिलिंद केदारे, भावेश केदारे ,देविदास वन्से, निखिल केदारे, पंकज गवंडे ,ऋषिकेश गवंडे ,पृथ्वीराज डुकरे, ईश्वर गवंडे, आदी 151 मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा वारकरी महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष ,कार्याध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी लासलगाव खरेदी विक्री संघ, निफाड तालुका सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य मंडळ त्याचबरोबर सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे, उपसरपंच संदीप भोसले, उपसरपंच के के गवंडे ,चेअरमन दशरथ जेऊघाले, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब भोसले, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष राजाराम जाधव, ज्येष्ठ नागरिक सचिव काशिनाथ पाटील डुकरे ,तंटामुक्ती उपाध्यक्ष भाऊसाहेब जेऊघाले आदींचे सहकार्य लाभणार आहे.

Previous articleमुळा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची निवड
Next articleबनावट एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी, संबंधितावर तातडीने कारवाई करा असा जिल्हा प्रशासनाचा आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here