Home पुणे बनावट एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी, संबंधितावर तातडीने कारवाई करा असा जिल्हा प्रशासनाचा...

बनावट एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी, संबंधितावर तातडीने कारवाई करा असा जिल्हा प्रशासनाचा आदेश

126

आशाताई बच्छाव

IMG_20240307_072111.jpg

पुणे ,(प्रतिनिधी मयुर चव्हाण )- बनावट एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी,
संबंधितावर तातडीने कारवाई करा असा जिल्हा प्रशासनाचा आदेश असतानाही कारवाई ही का होत नाही आहे, पुणे हवेली दस्त नोंदणी कार्यालय १९ येथे बनावट दस्त नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता, जिल्हा प्रशासनाचा कारवाईचा आदेश असतानाही कारवाई होत नाही यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे का असा दाट संशय येत आहे, वडगाव शेरी येथील शेतजमीन एकाकडे घाणवट ठेवली असून तिची परस्पर विक्री झाली आहे पूर्ण दस्तावेज हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आले असून त्यामध्ये एनए ऑर्डर ही बनावट असल्याचे समोर आले होते, तरीही कारवाई काहीच झाली नाही तर याला जबाबदार कोण आहे प्रशासनाने याचे उत्तर द्यावे बनावट दस्त प्रकरणी गरीब शेतकरी जनतेचे हाल होत आहे, याबाबत सह जिल्हानिबंधक एम. बी .खामकर साहेब यांनी हवेली क्रमांक 19, च्या सहदुय्यम निबंधकांना पत्र पाठवून देखील पुढील कारवाई होत नाहीये याकडे प्रशासनाचे लक्ष नाही‌.

Previous articleसारोळे खुर्दला आज 151 ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता महापर्व सोहळा व पवित्र मेळा
Next articleजागतिक महिला दिन कार्यपरिचय अँड विनया नागरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.