Home सांगली सांगलीमध्ये लँड जिहाद चे प्रकरण उघडकीस

सांगलीमध्ये लँड जिहाद चे प्रकरण उघडकीस

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_190626.jpg

सांगलीमध्ये लँड जिहाद चे प्रकरण उघडकीस
सांगली,(शरद चव्हाण ब्युरो चीफ)- श्रीमती कबाडे वय वर्षे 77 या सांगलीमध्ये राहतात यांचा मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. त्याचे निधन मागच्या वर्षी अचानक झाले या महिलेचे मागे नातवंडे असतात ती पुणे येथे राहतात श्रीमती कबाडे यांचे रहाते घर गुलमोहोर कॉलनी येथे आहे. व त्यांचा एक वीस हजार चौरस फुटाचा मोकळा प्लॉट सह्याद्री नगर येथे आहे हे सर्व हेरून येथील लँड माफिया युनुस जमादार याने त्यांच्या वृद्धत्वाचा फायदा घेऊन या भूखंडाला कुंपण घालून तेथे एका रात्रीमध्ये शेड मारली व महावितरण कडे कनेक्शन मागणीचा अर्ज केला. या जागेचे बोगस मुखत्यार पत्र घेऊन त्याने हे सर्व काम केले आहे. हा सर्व एक कट असून हा एक लँडजिहादचा प्रकार आहे. यानंतर त्यांनी सौ नीता खेळकर यांना संपर्क साधला व या जमादार विरुद्ध श्रीमती कबाडे व त्यांची नात व नातू यांनी संजय नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता त्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये ट्रेस पासिंग चा गुन्हा दाखल केला. तथापी या आरोपीने शेड न काढता वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय मी काही करणार नाही असे पोलिसांना सांगून तो पोलीस स्टेशन मधून निघून गेला व कोर्टामध्ये त्याने स्टे मिळवण्याकरता अर्ज केला. या प्रकारामुळे हे कुटुंब गर्भगळीत होऊन त्यांनी सौ नीता केळकर यांना संपर्क साधला सौ.नीता केळकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व माहिती घेतली. बोगस कागदपत्राद्वारे दाखल केलेली केस कोर्टातून निर्णय व्हायला अनेक वर्षांचा कालावधी गेला असता हे ओळखून ,सौ.नीता केळकर यांनी दुसऱ्या दिवशी स्वतः जेसीबी बोलावून समोर उभे राहून त्यांनी शेड जमीन दोस्त केली. यानंतर हिंदू एकताचे नितीन शिंदे यांनी येऊन या कुटुंबाची विचारपूस केली हा जमीन बळवण्याचा प्रकार या इसमाने किंवा या प्रकारचा प्रकार आणखी कुठे घडला असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा नेत्या सौ. नीता केळकर व श्री नितीन राजे शिंदे यांनी केले आहे. या इसमाची संपूर्ण चौकशी करून या लँड माफियांविरुद्ध कायद्याचा सक्त बडगा उगारून अशा बळी गेलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous articleदि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर 6 एप्रिलला भंडारा येथे
Next articleदहशत निर्माण करणाऱ्या पाच गुंडांना एक वर्षासाठी करण्यात आले स्थानबद्ध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here